2 MIN READ

इंग्लिश अभिनेत्री जोन कॉलिन्स ने म्हटले आहे कि, जर तुम्ही एखादी वाईनची बाटली नसाल तर तुमचे वय हि निवळ एक संख्या आहे, तिचा काही उपयोग नाही.

हे वाक्य सेक्स लाईफच्या बाबतिती अगदी योग्य आहे. “आनंदी सेक्स लाईफ” साठी कोणतीही वयोमर्यादा नाही. एका संशोधनानुसार, असे आढळले आहे कि आजकाल मोठ्या प्रमाणावर वृद्ध पुरुष आणि महिला सेक्स लाईफचा आनंद घेत आहेत.

तुम्हाला अजून माहिती घ्यायची आहे का? वृद्ध जोडप्यांचे शारीरिक संबंध अजून चांगले व्हावेत या उद्धेशाने आम्ही या लेखात काही टिप्स दिल्या आहेत. तसेच यातून वाचकांना काही अशी माहिती समजेल जी संशोधनातून समोर आली आहे.

संशोधनातून काय समोर आले

युनायटेड स्टेट्स नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनचा भाग असलेल्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) यांच्या संशोधनानुसार, असे समोर आले आहे कि उतारवयात सेक्सशुअली ऍक्टिव्ह लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनातून समोर आलेले आकडे खाली दिलेले आहेत:

तक्ता 1: उतारवयात सेक्सच्युली ऍक्टिव्ह लोकांच्या संख्येत झालेली वाढ खालील तक्त्यात दाखवण्यात आली आहे.

1971आत्ताचे संशोधन
70 वर्षांवरील पुरुष52%68%
70 वर्षातवरील महिला38%56%

वरील तक्त्यात सांगण्यात आले आहे कि 1971 मध्ये 70 वर्षावरील 52% पुरुष आणि 38% महिला सेक्सशुअली ऍक्टिव्ह होत्या. हेच आकडे आता 68% पुरुष आणि 56% महिला एवढे वाढले आहेत.

एवढेच नव्हे तर यातील 50% लोकांचे म्हणने आहे कि त्यांची सेक्स लाईफ चांगली आहे आणि 25% लोक तर आठवड्यातून एकदा संभोग करतात.

आनंदी सेक्स लाईफचे रहस्य काय असते?

ज्या वृद्ध वाचकांना आपल्या शारीरिक संबंधांत पुन्हा तोच जोश आणायचा आहे त्यांच्यासाठी खाली आम्ही काही टिप्स दिल्या आहेत:

संवाद साधा: तुमच्या पार्टनर समोर तुमचे विचार, इच्छा आणि भावना व्यक्त करा ही सर्वात महत्वाची टीप आहे. यामुळे तुमची सेक्स लाईफ आनंददायी होऊ शकते.

निरोगी मन, निरोगी शरीर: फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या निरोगी असणे ही दुसरी महत्वाची बाब आहे. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा, दारू आणि सिगारेट चे व्यसन सोडा, तसेच चांगला आहार घ्या.

रोमान्स करत राहा: तुमच्या पार्टनर सोबत नवनवीन प्रयोग करत राहा. जेणेकरून तुमच्यातील जोश कायम राहील.

दिनचर्या बदला: सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे जेव्हा तुमची एनर्जी जास्त असेल तेव्हा तुम्ही सेक्स केले पाहिजे, अशी दिनचर्या निवडा. रात्री दमून भागून काही करण्यापेक्षा सकाळची वेळ योग्य.

वरील सर्व टिप्स तुम्हाला आनंददायी सेक्स लाईफ मिळवण्यास नक्कीच मदत करतील. आणि लक्षात ठेवा,

वय भावानांचा खेळ आहेवर्षांचा नाही!” –जॉर्ज विलियम कर्टीस

Ask a question regarding आंनदी सेक्स लाईफला वयोमर्यादा नसते!

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here