2 MIN READ

आपण तरुण आणि तेजस्वी दिसावे हे प्रत्येक स्त्रिला वाटत असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुमचे वय साठ पेक्षा पुढे गेले असेल तर तुम्ही ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात तुम्हाला तुमच्या त्वचेची योग्य आणि जास्त काळजी घ्यावी लागते. निरोगी आणि समतोल आहारासोबत त्वचेची थोडीफार काळजी घेतल्यास तुमचे सौंदर्य दीर्घकाळ टिकू शकते.

खाली दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही उतारवयात पण सुंदर आणि तेजस्वी त्वचा मिळवू शकता.

१. सन प्रोटेक्शन
सूर्यप्रकाशात असणारी अतिनील किरणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यामुळे घरातून बाहेर पडताना सनब्लॉकचा वापर करावा. अतिनील किरणांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग वाढू शकतात आणि काही जणांना कर्करोगाचा पण धोका असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी एखादा चांगला सनब्लॉक वापरणे केव्हाही चांगलेच.

२. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा
उतारवयात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते. झोपण्यापूर्वी जेल-आधारित फेसवॉशने चेहरा धुणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. चेहरा धुताना साबण टाळावा, साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.

३. त्वचेतील ओलावा जपा
उतारवयात त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाणे कमी होते त्यामुळे त्वचा कोरडी दिसू लागते. त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासाठी चांगल्या मॉइस्चरायजरचा वापर करावा. हर्बल आणि रसायन मुक्त मॉइस्चरायजर मुळे तुमच्या त्वचेची चमक अधिक वाढू शकते.

चेहऱ्यावर लावलेले कच्चे दूध पण मॉइस्चरायजरचे काम करू शकते.

४. रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळा
सौंदर्यप्रसाधनांमधील घातक व हानिकारक रसायनांमुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते. त्याऐवजी नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने आणि हेअर केअर प्रॉडकट्स वापरावेत ज्यामधे कोरफड, ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाच्या तेलाचा समावेश असेल. याने तुमच्या त्वचेचा टेक्सचर सुधारण्यास मदत होईल.

मध एक अँटी-ऑक्सिडेन्ट आहे आणि अँटी-एजिंग म्हणून पण वापरता येते. दोन चमचे मधात लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. या घरगुती उपायामुळे तुमच्या चेहऱ्यातील ओलावा कायम राहतो आणि तुमची त्वचा कोमल होते.

५. निरोगी आहार
फळ आणि भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. शिमला मिरची मुळे शरीरातील रक्त संचलन चांगले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. व्हिटॅमिन-C असणाऱ्या फळांमुळे उतारवायत कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच तुमच्या शरीरात जमा झालेलं टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.

नारळाचे तेल हे बहुपयोगी आहे ज्याचा वापर तुम्ही जेवणात करू शकता किंवा मॉइस्चरायजर तसेच फेस आणि बॉडी क्रिम म्हणून पण नारळाच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

अशाप्रकारे, जर तुम्ही आहाराची आणि त्वचेची थोडी काळजी घेतली तर तुमची त्वचा उतारवयात पण सुंदर, कोमल आणि तेजस्वी दिसू शकते.

Ask a question regarding उतारवयात पण सुंदर आणि तेजस्वी त्वचा मिळवण्याचे पाच उपाय

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here