2 MIN READ

तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून दूर राहता का?
त्यांचे वय वाढत असताना तुम्ही त्यांच्यापासून लांब आहात म्हणून तुम्हाला काळजी वाटू शकते.
त्यांना काही झाले तर किंवा त्यांना मदत लागली तर?
एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भभवली आणि त्यांना मदत लागली तर?
अशावेळी काय करता येईल?

एकाच घरात राहून पण आपल्या पालकांची काळजी घेणे आवाहनात्मक आणि जटील असते आणि, जर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहत असाल तर हे अजून गुंतागुंतीचे होऊ शकते.

जर दूर राहूनही तुम्हाला तुमच्या आई वडिलांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही खालील उपाय करू शकता:

1. सतत संपर्कात राहा
कोणत्याही नात्यात संवाद महत्वाचा आहे. तुमच्या आई वडिलांच्या, त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या आणि शेजाऱ्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. आजकालच्या डिजिटल युगात तुम्ही व्हिडीओ चॅट किंवा सोशिअल मिडियाच्या माध्यमातून अगदी सहज संपर्क साधू शकता.

2. माहिती गोळा करून ठेवा
तुमच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या लक्षात घ्या आणि त्यानुसार नियोजन करा. डॉक्टरची अपॉइंटमेंट, बिलं आणि खात्यांची माहिती इत्यादी नीट गोळा करून ठेवा. तसेच डॉक्टर, मेडिकल आणि शेजाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स तुमच्याजवळ बाळगा.

3. भेटायला गेल्यानंतर वेळ घालवा
जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना भेटायला जाल तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालावा. त्यांच्यासोबत गप्पा मारा, फिरायला जा यातून तुम्हाला त्यांच्या मनातील विचार समजतील तसेच त्यांना काही त्रास असेल तर तोही यातून समोर येऊ शकतो.

4. कायदेशीर आणि आर्थिक बाबींवर चर्चा करा.
कायदेशीर आणि आर्थिक बाबींवर चर्चा करणे थोडे कठीण वाटू शकते पण यातून तुमचे पालक अजूनही किती सक्षम आहेत याची माहिती मिळते. अधून मधून त्यांचे कायदेशीर आणि आर्थिक व्यवहार बघत जा. त्याची एखादी फाईल तयार ठेवा म्हणजे एखादे संकट आल्यास तुम्ही तयार असाल.

5. तंत्रज्ञानाची मदत घ्या
तांत्रिक प्रगतीमुळे दुरूनही तुमच्या पालकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे सोप्पे झाले आहे. तुम्ही मोबाइल वर मेडिकल अलर्ट सिस्टम तयार करू शकता किंवा स्पीड डायल सिस्टम तयार ठेऊ शकता. त्यासाठी तुम्ही अनेक ऍप्सचा वापर करू शकता. उदा.:

Aegis
Care24
Zoctr
दूर राहून आपल्या पालकांची काळजी घेणे कठीण जरी असले तरी ते आवश्यक आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला त्यांच्यापासून दूर राहावे लागते पण उपरोक्त टिप्स तुम्हाला तिथे राहूनही त्यांची काळजी घेण्यास मदत करतील तसेच तुम्हाला त्यांची माहिती सतत मिळत राहील.

Ask a question regarding दूर राहूनही आपल्या पालकांची काळजी घेण्याचे पाच उपाय

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here