2 MIN READ

रक्तक्षय किंवा ॲनिमिया हे भारतासमोर उभे ठाकलेले एक वैद्यकीय आव्हान आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जगातील १६२ कोटी नागरीक ॲनिमियाशी झुंज देत आहेत. यातील ५० टक्के रुग्णांना आयरनच्या (लोह) कमतरतेमुळे ॲनिमिया झाला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात ॲनिमियाचे ४५% रुग्ण हे ६० वर्षांवरील नागरीक आहेत. त्यातही पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त प्रमाणात ॲनिमियाग्रस्त असतात. भारतातील ज्येष्ठ नागरीकांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण किती, कारणे कोणती याचा समग्र आढावा आपण घेऊया.

जरी आयरनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होत असला तरी, शरीरात आयरनचा अभाव आहे हे फार उशिरा सिद्ध करणारा हा विकार आहे. कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या नागरीकांत किंवा देशांत ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे.

ॲनिमिया किंवा आयरनच्या कमतरतेमुळे ज्येष्ठांमध्ये अशक्तपणा वाढीस लागला आहे. 

ॲनिमियाची लक्षणे

अशक्तपणामुळे ग्रस्त असणारे बहुतेक लोक सारखा थकवा आल्याची  तक्रार करतात. थकवा आलेल्या ८६.% वृद्धांपैकी ८०% लोकांना अशक्तपणा येतो तसेच श्वास लागणे (४५.७%), पायात सूज (२२.९%), डोकेदुखी (१९%), चक्कर (१८.१%), छातीत धडधड (१४.३%) आहे. नाक किंवा कानातून रक्तस्त्राव (१२.४%) आणि कानात गुणगुण ऐकू येणे (६.७%) ही लक्षणे दिसून येतात. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना चक्कर येण्याची शक्यता अधिक असते.

शारीरिक तपासणीत दिसून येणारे सर्वसामान्य लक्षण म्हणजे चेहरा म्लान होणे. हे ८४.८% वृद्धांमध्ये दिसून येते. या व्यतिरिक्त असंख्य रूग्णांमध्ये हातापायाला तसेच जिभेला सूज आल्याचे दिसून येते.

ॲनिमियाची कारणे आणि प्रकार

आयरनची कमतरता हे ॲनिमियाचे सर्वात मोठे कारण आहेयाव्यतिरिक्त, गंभीर रोगांमध्ये अशक्तपणा, रक्ताचे विकार, किडनीचे गंभीर विकार, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, फोलेटची कमतरता, हायपोथायरॉईडीझम (थायरॉईड हा हार्मोन कमी प्रमाणात निर्माण होणे) यांपैकी कोणत्याही कारणामुळे  ॲनिमिया होण्याची शक्यता असते.

हे आवर्जून वाचा: वृद्धावस्थेत जास्त पाणी पिण्याने होतील हे अजब फायदे

ॲनिमियाची कारणे :

 • आयरनची कमतरता
 • फॉलिक  ॲसिडची कमतरता
 • पचनसंस्थेचा अल्सर
 • एखादा मोठा आजार
 • अस्थिमगजाशी निगडीत विकार
 • मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव
 • किडनीचा गंभीर आजार
 • संसर्गजन्य आजार
 • गुंतागुंतीची सर्जरी

 ॲनिमिया विविध प्रकारचा असतो: 

 • आयरन डेफिशिएन्सी ॲनिमिया – लोहाची कमतरता
 • पर्नीशिअस ॲनिमिया –  व्हिटॅमिन बी 12 आणि फोलेटचा अभाव
 • अप्लास्टिक ॲनिमिया- अस्थिमज्जा/ अस्थिमगज विकार
 • हिमोलायटिक ॲनिमिया- लाल रक्त पेशी मोडणे
 • सिकल सेल ॲनिमिया- लाल रक्त पेशी टोकदार होणे
 • इतर आजारांमुळे किंवा केमोथेरपीमुळे उद्भवणारा ॲनिमिया

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांचे पोषण: सुखद वृद्धत्वासाठी आहारविषयक मार्गदर्शन

निष्कर्ष

भारतात ज्येष्ठ नागरीकांची संख्या सातत्याने वाढत आहे. डॉक्टारांनीदेखील ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जर ॲनिमियावर वेळीच उपचार केला नाही तर अनेक आजार बळावू शकतात. जर अशक्तपणाचे कारण ॲनिमिया हे नसेल तर कोणते कारण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. आहारात योग्य ते बदल करून ॲनिमिया सहज बरा होऊ शकतो.

Read this here in English

Ask a question regarding भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये ॲनिमिया: घेऊया संपूर्ण आढावा 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here