3 MIN READ

प्राणायाम (श्वसनाचा व्यायाम)

भस्रिका प्राणायाम: यात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो. हा प्राणायामाचा प्रकार म्हणजे ‘कपालभाती’ आणि ‘उज्जयी’ यांचा संयोग आहे. श्वसनावर लक्ष केंद्रित करून हा प्राणायाम केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होऊन मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. त्यामुळे नियमित भस्रिका केल्याने अर्धशिशीला आराम मिळू शकतो. 

पद्मासन

हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाने मन एकाग्र होण्यास मदत होते. त्याचबरोबर पाठीचा कणा, गुडघे आणि पायाच्या घोट्याला होणारे त्रास कमी होतात.

हस्त उत्तानासन

कानांच्या रेषेत हात सरळ वर करून ताणणे म्हणजे हस्त उत्तानासन. हे आसन केल्याने पाठीचा कणा आणि खांद्याकडील स्नायू मोकळे होतात. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन मन तणावमुक्त होते. यामुळे परानुकंपी चेतासंस्था (Parasympathetic nervous system) सक्रिय होते.

पश्चिमोत्तानासन

पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे. हे आसन करताना सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं. पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत. मान सरळ आणि समोर असावी. कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे. कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे. यादरम्यान संथ श्वास चालू ठेवावा. थोडा वेळ याच स्थितीत बसावे. हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं. हे आसन केल्यास पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात तसेच पचनक्षमता सुधारते. (सूचना- स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये.)

कार्डिओ

धावणे या क्रियेचा ज्या व्यायामप्रकारात समावेश होतो, त्याला इंग्रजीत कार्डिओ म्हटले जाते. कार्डिओ म्हणजे हृदयाशी संबंधित. धावण्याचा व्यायाम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. श्वसनाशी संबंधित म्हणजेच श्वासोच्छवास सुसूत्रित करणाऱ्या प्रकारांचाही यात समावेश होतो. यामुळे शरीरभर रक्ताभिसरण होऊन मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग म्हणजे हात व पाय मोकळे करत कंबर, पाठ, पोटावर ताण देणे.  हृदय विकारामुळे मेंदूतील काही महत्वाचे भाग, ग्रंथींपर्यंत रक्तपेशी पोहोचत नाहीत. मायग्रेनमुळे हृदयाकडून मेंदूला संदेश वेळेवर पोहोचत नाही. स्ट्रेचिंगमुळे स्नायू मोकळे होतात तसेच अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या पूर्ववत होण्यास मदत होते.

Ask a question regarding मायग्रेनपासून मुक्ती मिळवण्यासाठी ६ व्यायामप्रकार

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here