3 MIN READ

अनेक जण सकाळी कपभर चहा पिऊन ( उपाशीपोटीचे ) रक्त देण्यासाठी येतात , अशा व्यक्तिना नाईलाजाने रक्त न घेता परत पाठवावे लागते. वरील माहितीनंतर आता प्रत्यक्ष कुठल्या तपासण्या करायच्या याकडे वळूया!

1. वैद्यकीय प्रयोगशाळेत (Pathology Laboratory) मध्ये केल्या जाणा – या सर्वसाधारण तपासण्या (
रक्त , लघवी इ.):
रक्ताच्या तपासण्याम हीमोग्राम ( हीमोग्लोबीन , पांढ – या रक्तपेशी व प्लेटलेटस् यांचे प्रमाण), रक्तातील
उपाशीपोटीची व जेवणानंतरची शर्करा, रक्तातील मागील ४ महिन्यांतील शर्करेची सरासरी ( ग्लायकोसायलेटेड
हीमोग्लोबीन / । HbA1c, मधुगेही व्यक्तीं मध्ये ही चाचणी नियमितपणे करावी लागते), लीपीड प्रोफाईल ( सर्व
प्रकारच्या चरबीची तपासणी , ज्यामध्ये एकत्रित कोलेस्टेरॉल, चांगले व वाईट कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड
इ . तपासले जाते ), मूत्रपिंडासाठीच्या तपासण्या ( युरीया, क्रीएटीनीन व इलेक्ट्रोलाईट्स), यकृतासाठीच्या
रक्तचाचण्या, थायरॉईड ग्रंथीच्या क्षमतेसाठीची TSH ही मुख्य चाचणी, प्रोस्टेट ग्रंथीसाठी पुरुषांमध्ये केली
जाणारी PSA ( प्रोटेट स्पेसिफिक अँटीजेन ) ही अत्यंत महत्त्वाची रक्तचाचणी या तपासण्या अंतर्भूत आहेत,
लघवीच्या तपासणीमध्ये रुटीन / सर्वसाधारण तपासणी ( ज्यामध्ये मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग, लघवीमध्ये रक्त /
अतिरिक्त प्रथिने जात आहेत का हे पाहाणे ) व micrpalbumin या विशिष्ट प्रथिनासाठीची तपासणी
महत्त्वाची आहे. मधुमेही च उश्च रक्तदाब असलेल्या व्यक्तिमध्ये मूत्रपिंडांची कार्यक्षमता अबाधित आहे ना
याची खात्री करण्यासाठी microalbumin ची तपासणी विशेषकरून केली जाते.

शौचाच्या / विष्ठेच्या तपासणीमध्ये शौचावाटे रक्त जात आहे का हे तपासणे (Occult Blood Test) ज्येष्ठ
नागरिकांमध्ये विशेष महत्त्वाचे आहे . रक्तक्षय ( अॅनिमिया / हिमोग्लोबीनचा अभाव ) वाढत्या वयात अनेकदा
दिसून येतो. जठरातून किंवा आतड्यातून सतत / दीर्घकाळ होणा – या रक्तस्त्रावामुळे ही समस्या उद्भवते. हे
रक्त आपल्याला शौचामध्ये डोळ्यांनी दिसत नाही ; परंतु सूक्ष्मदर्शकाखाली तपासून त्याचे निदान करता येते.
जर असे निदान झाले तर या व्यक्तिंना दुर्बीणीद्वारे पुढील तपास (Endoscopy) करण्याचा सल्ला दिला
जातो.

रक्तातील ड जीवनसत्त्व व ब – १२ जीवनसत्त्व यांचे प्रमाणही हल्ली नियमितपणे तपासण्यास आम्ही
सांगतो, कारण या दोन्ही जीवनसत्त्वांचा अभाव रक्तामध्ये बहुतांशी व्यक्तिंमध्ये आढळून येतो व यामुळे
अनेक प्रकारचे शारीरिक / मानसिक त्रास होऊ शकतात.

तपासणीसाठी रक्त देतच असल्यामुळे रक्तगट तपासणेही उत्तम! (ABO व Rh गट) मागेपुढे समजा रक्त
देण्यची वा घेण्याची गरज पडल्यास रक्तगट ज्ञात असणे महत्वाचे !

2. हृदय संबंधित चाचण्या
यामध्ये इसीजी ची चाचणी सर्वात मूलभूत मानली जाते, जी करणे अत्यंत सुलभ आहे व हृदयाशी संबंधीत अनेक
आजारानं विषयाची प्राथमिक माहिती यातून मिळते.

स्ट्रेस टेस्ट मध्ये त्या व्यक्तीस पट्यावर चालण्याचा व्यायाम करण्यास सांगितले जाते , पट्याचा वेग व
चढ दर ३ मिनिटांनी दाढतो . तपासणी दरम्यान पट्ट्यावर चालताना रक्तदाब, हृदयाचे ठोके व इ. सी. जी.
यांचे नियमित परीक्षण केले जाते, इ इ . सी . जी . मध्ये काही बदल / abnormality आढळल्यास इदयविकाराची शक्यता वर्तली जाते काही वेळा सर्वसाधारण इ. सी. जी. (resting इ. सी. जी. ) नॉर्मल असतो , परंतु ट्रेडमील टेस्ट चा अहवाल abnormal येऊ शकतो व म्हणूनच या चाचणीचे महत्व आहे. या तपासणीला Exercise ECG
असेही संबोधले जाते  मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या ज्येष्य नागरिकांना तीव्र स्वरूपाची गुडघेदुखी , कंबरदुखी आहे , ज्यांना खूप दम ला तो आहे किंवा इतर काही मोठा त्रास आहे , अशा व्यक्तिमध्ये अनेकदा ही चाचणी करण्याबाबत
मर्यादा येऊ शकतात.

एकोकार्डिओफी; न्हुणजे हृदयाची सोनोग्राफी ! यामध्ये या कार्यक्षमता (आकुंचन प्रसरण ), स्नायू, झडपा इ
. ची सविस्तर माहिती मिळते मात्र एक गोष्ट याठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे व ती महणजे स्ट्रेस व एकोकार्डिओग्राफी या दोन तपासण्यांमधून वेगवेगळी माहिती मिळते म्हणजेच या दोन्ही एकमेकांना पूरक तपासण्या आहेत व पर्याय नाहीत!
यामुळे प्रत्येक व्यक्तिने कधीतरी या दोन्ही तपासण्या करून घेणे इष्ट!

3.‘ क्ष – किरण ‘ संबंधित (Radiological) तपासण्या:
(यामध्ये पोटाची / ओटीपोटाची सोनोग्रफी र छातीचा क्ष किरण फोटो या । । रार्वसाधारण तपासण्या म्हणता
येतील.
पुरूष ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची आहे . ग्रंथीचा
आकार वाढल आहे का ? मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते आहे ना की लघवी साठून राहते आहे ( ज्यामुळे
जंतूसंसर्ग होण्याचा धोका वाढतो )।
इ . गोष्टी प्रामुख्याने तपासल्या जातात . गुदद्वारावाटे सुद्धा सोनोग्राफी करता येते (Trans – rectal
ultrasound) , जी या संदर्भात अधिक उपयुक्त मानली जाते.

स्त्रियांमध्ये गर्भाशय, बीजांडे, बीजनलिका याबद्दल सविस्तर माहिती सोनोग्राफीमध्ये मिळते. या व्यतिरिक्त स्त्री व पुरुष दोघांमध्ये पित्ताशयातील खडे , मूत्रमार्गातील खडे , यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे आजार इ. च्या निदानासाठीही सोनोग्राफी महत्वाची आहे.

4. स्त्रियांच्या आजारांशी संबंधित तपासण्या:
यामध्ये मॅमोग्राफी (स्तनांची – क्ष किरण तपासणी ) , पापस्मेर चाचणी ( गर्भाशयमुख म्हणजे Cervix च्या
कर्करोगासाठीची तपासणी ) व वर सांगितल्याप्रमाणे ओटीपोटाची सोनो ग्राफी या चाचण्यांचा समावेश आहे.

5. संधीवाताशी संबंधित चाचण्या:
यामध्ये गुडघ्यांची / मणक्यांची क्ष किरण तपासणी , हाडांची घनता मोजण्यासाठी डेक्सा स्कॅन ही तपासणी
तसेच काही रक्ताच्या चाचण्या (सी. आर. पी., युरीक अॅसीड, आमवातासाठीची मॅटॉईड फेक्टर ही चाचणी
इ.) यांचा समावेश होतो

तपासणीव्यतिरिक्त काही वैद्यकीय तज्ञांकड़े नियमित सल्ला मसलत करणेही आवश्यक आहे .
यामध्ये डोळ्यांचे डॉक्टर (फक्त चष्याच्या नंबरसाठी नाही तर मोतीबिंदू, काचबिंदू , मधुमेहामुळे होणारी
रेटिनोपॅथी इ. च्या निदानासाठी), दंतरोगतज्ञ च नाक कान – घसा तज्ञ यांचा उल्लेख करावा लागेल ,
तसैच स्त्रियांनी वर्षातून किमान एकदा तरी स्त्री रोग तज्ञांकडून नियमित तपासणी करून घेणे हितावह आहे ,
मधुमेही व्यक्तिंना काही वेळा आहारतज्ञ, न्युरोलॉजिस्ट, मूत्रपिंडविकारतज्ञ, हृदयरोगता इ . तज्ञ मंडळींकडे
विशेष सल्ल्यासाठी पाठविले जाते.
वरील सर्व चर्चेवरून प्रतिबंधात्मक चाचण्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी किती महत्वाच्या आहेत हे लक्षात
येईल . त्यामुळे त्यादृष्टीने खबरदारी घेऊन अनेक गंभीर आजार टाळणे किंवा आजाराचे अगदी सुरुवातीच्या
काळातच निदान करणे सहज शक्य होईल.

Ask a question regarding मूलभूत पॅथॉलॉजीकल चाचण्या

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here