वाढत्या वयानुसार शरीरात होणारे ७ बदल

0
3 MIN READ

1पेशी कमकुवत होण्यास सुरवात होते

वाढत्या वयाबरोबर शरीरातील अनेक पेशी कमकुवत होण्यास सुरवात होते, तसेच काही इंद्रियांची नवीन पेशी उत्पन्न करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. हृद्य, मेंदू, किडनी,यकृत, बीजकोष आणि अंडकोष यांची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. हे सर्व बदल हळू हळू वाहायला सुरवात होते. पेशी कमजोर झाल्यामुळे आजारी पाडण्याचे प्रमाण वाढते औषोधूपचारांची गरज भासू लागते.

2हार्मोनल असंतुलन होणे

वय वाढेल तसे हार्मोनल असंतुलित वाहावयास सुरवात होते. स्त्रियांमध्ये सामान्यपणे असणारे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन पुरुष्यांमधे टेस्टोस्टेरॉन हे कमी वाहायला लागतात. स्त्रियांच्यात होण्याऱ्या हार्मोनल बदल हा तिच्या मासिक पाळी जाण्याच्या म्हणजेच मेनोपॉज  च्या  प्रक्रियेशी संबंधित असतो.

3चया पचयाची क्रिया मंदावणे

आपल्या शरीरातील काही पेशी या आपल्याला काही रोग होण्यापासून वाचवत असतात. या पेशी कमकुवत होण्यास सुरवात झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या चयापचया च्या क्रियेवर होतो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊं लागते.

4वाढत्या वयाबरोबर हाडे, स्न्यायु, त्वचा यामध्ये होणारे बदल

जसे वय वाढेल तसे हाडे ठिसूळ व्हायला सुरवात होतात. स्त्रियांचा मोनोपॉज नंतर याचा जास्त परिणाम दिसून येतो. शरीरात कॅल्शिअम ची कमतरता होऊ लागते. संधिवात आस्टिओपोरॉसिस, हाडे ठिसूळ होणे ची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हाडे फॅक्चर होणे सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

5मेंदू वृद्ध होणे

वाढत्या वयाबरोबर मेंदू वृद्ध होण्यास सुरवात होते. इतर अवयव जसे संकुचित जातात, आक्रसून जातात तसाच मेंदू सुद्धा आक्रसून जातो. परिणामी गोष्टी विसरायला सुरवात होते. पुढे जाऊन अल्झायमर, पार्किन्सन सारखे रोग होऊ शकतात.

6पुनर्रउत्पादन बदल ( रिप्रोडुक्टिव्ह चेंजेस )

वाढत्या वयाबरोबर स्त्रियांची मासिक पाळी जाण्याची म्हणजेच मेनोपॉझ ची प्रक्रिया झपाटयाने सुरु होते, त्यामुळे गर्भ धारणे साठी आवश्यक्य असणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स तयार होत नाहीत. पुरुषांच्या मध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स कमी वाहायला लागतातत्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.

7मूत्रपिंड समस्या (किडनी ची समस्या)

किडनी हि शरीरातील रक्त शुद्ध करून नको असलेली द्रव्य बाहेर काढते. वाढत्या वयाबरोबर किडनी चे कार्य मंदावते. तंदुरुस्त लोकांमध्ये किडनी चे कार्य नॉर्मल राहते. परंतु हायब्लड प्रेशर, डायबेटिज सारख्या रोगांमध्ये घ्यावे लागणारी औषधे इतर अनेख औषधंमुळे किडनी चे कार्य मंदावते.

Ask a question regarding वाढत्या वयानुसार शरीरात होणारे ७ बदल

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here