1 MIN READ

भारतात हृदयविकाराचा रोग (Cardiovascular Disease-सीव्हीडी) मृत्यूचे मुख्य कारण बनले आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार, भारतात प्रत्येकी 100000 लोकांमध्ये 272 हा रुग्णदर वयानुसार प्रमाणित केलेल्या जागतिक सीव्हीडी मृत्यू दर सरासरीपेक्षा जास्त आहे. (100000 लोकांमध्ये 235 हा रुग्ण्दर)

जर आपण हृदयरोगाने ग्रस्त असाल तर हृदय गमवून बसण्याची गरज नाही, हा झाला विनोदाचा भाग. योग्य जीवनशैली आणि सवयिसह आपण निरोगी जीवन जगू शकता. आपले डॉक्टर आपल्याला एक उपचार योजना आणि औषधे सूचित करतील. परंतु, त्याशिवाय दीर्घायुषी होण्यासाठी आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण स्वत:मध्ये या जीवनशैली समाविष्ट करू शकता.

खाली आपण अंगिकाराव्या अश्या प्रमुख सवयी आहेत जे आपले हृदय निरोगी ठेवतील:

फायबर आणि निरोगी fats: फायबर रक्त शर्करा नियंत्रित करते आणि कोलेस्टेरॉल कमी करते. प्रत्येक जेवणामध्ये भरपूर फायबर समृद्ध फळे आणि भाज्या खाव्यात. ओमेगा-3 फॅटी ऍसिड समृध्द अन्न हृदयरोग असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे. मुख्यतः पूर्ण फायबर धान्य, फळे आणि हिरव्या पालेभाज्या यात फायबर आढळते. ओमेगा-3 फॅटी ऍसिडसाठी अक्रोड, बदाम, जवस, तुल्सिबीज आणि मासे खावे. फक्त हे अन्न कैलोरीज मध्ये जास्त असल्यामुळे योग्य ती सावधगिरी बाळगावी.

मद्यपान आणि धूम्रपान सोडणे: अल्कोहोलमध्ये भरपूर कॅलरी आहेत ज्यामुळे लठ्ठपणा येतो. हे आपल्या औषधामध्येही व्यत्यय आणू शकते आणि साइड इफेक्ट्स होऊ शकतात. आजार झाल्यानंतर तुमचे हृदय आधीच धोक्याच्या रेषेवर आहे. मद्यपान आणि धूम्रपान केल्यामुळे अधिक कठीन आणि कमकुवत बनते.

सक्रिय व्हा: हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. धावणे, हायकिंग किंवा पुश-अपसारखे कठोर व्यायाम निषिद्ध परंतु आपण सक्रिय राहण्यासाठी कमी प्रभावाचे व्यायाम समाविष्ट करू शकता. व्यायामामुळे आपण लठ्ठ असल्यास वजन कमी करण्यात मदत होते. चालणे आणि योग करणे यामुळे हृदयाच्या समस्येसह होणारया तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल. निरोगी राहण्यासाठी किमान 30 मिनिट व्यायाम करावा.

पुरेशी विश्रांती घेणे: पुरेशी झोप घेणे हे व्यायाम करण्याइतकेच महत्वाचे आहे. योग्य झोप घेतल्याने तुमचे हृदय ओव्हरएक्सर्ट होणार नाही. जर आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर अतिरिक्त उशी आपल्या डोक्याखाली ठेवावी. आपण जेथे झोपता तेथे शेड्यूल राखण्याचा प्रयत्न करा आणि दररोज तीच वेळ पाळा.

Ask a question regarding हृद्य विकारावर मात करण्यासाठी योग्य जीवनशैली

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here