५० च्या जवळ असाल तेव्हा आरोग्याच्या समस्या लक्षात घ्या

0
3 MIN READ

1तुम्ही पन्नाशीत आहात का?


तुम्ही जर पन्नाशीत पोहचला असाल तर तुम्ही तुमच्या शरीराला गृहीत धरू नका. ह्याच काळात काही जुने आजार डोके वर काढू शकता. ज्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. जर आपण जरूर ती काळजी घेतले नाही तर काही ठराविक  आजरांना  सामोरे जावे लागते.

2हार्टअटॅक

या काही ठराविक आजरांपैकी पन्नाशीच्या नंतर सर्वसामान्य पणे आढळणारी समस्या म्हणजे हार्टअटॅक. अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी केलेल्या २०१६ च्या सर्वे नुसार भारतामध्ये हार्ट अटॅक येण्याचे सरासरी वय ५२ दिसून आले आहे. अशी काही लक्षणे कि जी तुम्हाला धोक्याची सूचना देतात ती म्हणजे छातीत हातामध्ये दुखणे, श्वास लागणे, प्रमाण पेक्षा जास्त घाम येणे, सारखे डोके दुखणे इत्यादी.

3डायबेटिस

डायबेटिस हा भारतातला वेगाने वाढणारा रोग म्हणून ओळखला जातो. जवळ जवळ . करोड लोकांना डायबेटिस असल्याचे दिसून आले आहे. हि जगाच्या अर्धा लोकसंख्ये एवढी आहे. भारतीयांमध्ये डायबेटिस होण्याचे सरासरी वय ४२. वर्षे इतके दिसून आले आहे. डायबेटिस ची काही सुरवातीची लक्षणेभूख तहान वाढणे, सारखे लघवी होणे, थकवा, कमी दिसू लागणे वगैरे.

4उच्च रत्तदाब

२०१२ च्या शोधात्मक अभ्यासानुसार ४६% भारतीय हे वयाच्या ४९ व्या वर्षे  उच्च रत्तदाबाने ग्रासलेले दिसून आले. याला हायपरटेंशन असे हि म्हणतात. यामुळे हृदया संबंधीचे रोग होऊ शकतात. उच्च रत्तदाब हा कधी कधी लवकर लक्ष्यात येत नाही आणि हा जुनाट आजरांपैकी सुद्धा असू शकतो त्यामुळे नियमित पणे तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

5हाडे ठिसूळ होणे

पन्नाशी नंतर तुमची हाडे  ठिसूळ होतात त्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. भारतात, 5% महिला आणि 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 24.6% पुरुष या रोगामुळे ग्रस्त आहेत. दुर्दैवाने, ही समस्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखणे कठीण आहे, परंतु अशी काही चिन्हे जसे पाठीचे दुखणे, उंची कमी होणे, कुबड येणे हि असू शकतात.

6सौम्य पुर: स्थ हायपरप्लासिया

यामध्ये पुर: स्थ ग्रंथी सामान्य आकारापेश्या मोठया होतात. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये हि वाढ आढळते. हि कर्करोग नसलेली वाढ असते. भारतामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांपैकी 50% पुरुषांना बीपी 1 आहे आणि 60 वयाच्या पर्यंत बहुतेक पुरुष या रोगामुळे ग्रस्त आहेत. याची बहुतेक लक्षणे मूत्रमार्गाशी संबंधित आहेत ज्यात रात्रीच्या मूत्र प्रवाहात लघवीची वारंवारता वाढते आणि मूत्राशय पूर्णपणे रिक्त होण्यास असमर्थता सुरू होते आणि थांबवते.

7स्तनाचा कर्करोग

ह्या कर्करोगाचे स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे. भारतातील ब्रेस्ट कॅन्सर रूग्णांपैकी 30% हे रूग्ण 50 ते. -60 वयोगटातील स्त्रियां आहेत. तसेच तितकेच चिंताजनक बाब म्हणजे तरुण स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची टक्केवारी वेगाने वाढत आहे. हि बाब खरोखरच चिंताजनक आहे. म्हणूनच वयाच्या ३० वर्षानंतर आपण तज्ञांकडून नियमितपणे स्तनपरीक्षा घेणे अनिवार्य आहे. या मध्ये मॅमोग्राम द्वारे तपासणी करण्याची सूचना तज्ज्ञ देऊ शकतात. त्याप्रमाणे ३० वर्षानंतर स्रियांनी नियमित पणे तपासणी करून घ्यावी. म्हणजे योग्य त्या औषोदुपचार घेऊन पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

8आजचे ५० वर्षे हि ६० वर्षे वयासारखी आहेत

पूर्वीच्या आयुष्यापेक्षा आजचे आयुष्य सर्वात जास्त तणावग्रस्त आहे. जीवनशैली पूर्ण बदललेली आहे . कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढण्याचे दिसून येते. व्यसन, वाढते प्रदूषण, बदललेल्या आहार इत्यादीमुळे जीवनशैलीवर परिणाम होतो. पूर्वीपेक्षा जास्ती आरोग्याच्या समस्यांना आज सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, आपल्या आरोग्याची काळजी घेण्याशिवाय आपल्यला यापुढे पर्याय नाही. आपण आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला योग्य आहार व्यायाम केला स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवले तर नक्कीच चागंले परिणाम बघायला मिळतील.

Ask a question regarding ५० च्या जवळ असाल तेव्हा आरोग्याच्या समस्या लक्षात घ्या

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here