2 MIN READ

द युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि हेल्पएज इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०२६ पर्यंत ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरीकांची संख्या १७.३ कोटीपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातही ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी आणि सुरक्षित वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. वृद्धांचे आरोग्य आणि सुरक्षा या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून ही पावले उचलणे गरजेचे आहे.

1. घरात असताना ज्येष्ठांनी सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी

जेव्हा वृद्धांसाठी सुरक्षित घर बांधायचे असते तेव्हा ते पडणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन ते बांधणे आवश्यक असते. घरात पडल्याने मोठ्या प्रमाणात वृद्ध लोक अपंग आणि पराधीन होतात असे NCBI चे म्हणणे आहे. किंबहुना, Indian Journal of Occupational therapy च्या अहवालानुसार ६०-९३ या वयोगटातील १९२ वृद्ध नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ३८.४ टक्के लोकांना आपण पडू की काय अशी भीती वाटत होती.

शक्यतो पायऱ्यांवर किंवा बाथरूम मध्ये जेष्ठ नागरीक घसरून पडतात. ते पडू नयेत यासाठी घ्यावयाची काळजी: 

 • जिन्यावर चढताना किंवा उतरताना आधारासाठी हँडरेल (दांडा) बसवून घ्यावा.
 • पायऱ्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी.
 • पायऱ्यांवर कचरा किंवा अडगळ ठेवू नये जेणेकरून घसरून पडण्याची शक्यता कमी होईल.
 • टॉयलेट-बाथरूम मध्ये आधारासाठी हँडल्स किंवा दांडा बसवावा.
 • बाथरूममध्ये अँटी-स्लिप फरशी बसवावी.
 • बाथरूमकडे जाणाच्या वाटेवर आणि बाथरूममध्ये लाईट्स बसवून घ्यावेत.
 • याचसोबत भुरटे चोर, दरोडेखोर यांपासून वृद्धांना वाचविण्यासाठी सेफटी डोअर आणि थेफ्ट/ बर्गलर अलार्म बसवून घ्यावा.

हे आवर्जून वाचा: 5 tips for effective long-distance caregiving

2. घराबाहेर असताना सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी

घराबाहेर असताना जास्त भीती असते ती रस्त्यावरील रहदारीची.चालताना किंवा ड्रायव्हिंग करताना खालीलप्रमाणे काळजी घेतल्यास संभाव्य धोके टळू शकतील.

 • रात्री ड्रायव्हिंग करणे टाळावे.
 • रात्री कुठे जायचे झाल्यास, ज्या रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था असेल अशा रस्त्यांना प्राधान्य द्या.
 • रात्री गाडी चालवताना हेडलाईट्स सुरु ठेवाव्या.
 • मागून आणि पुढून येणाऱ्या गाड्या व्यवस्थित दिसाव्या यासाठी आरसे आणि काचा पुसून घ्याव्या. तसेच लाईट्स सुद्धा पुसून घ्यावे.
 • जास्त रहदारीच्या वेळांमध्ये गाडी चालवणे टाळावे. उदा. ऑफिसला येण्याजाण्याच्या वेळा.
 • जर तुम्हाला गाडी चालवण्याविषयी आत्मविश्वास वाटत नसेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा.

3. तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी व्यवस्था प्रणाली:

दुर्घटना कोणासोबतही घडू शकतात आणि ज्येष्ठ नागरीकांसोबत मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडत असतात. त्यामुळे अशा वेळी काय करायचे याचा आधीच विचार केला पाहिजे.

मेडिकल अलर्ट प्रणाली बसवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकते. ही वैद्यकीय मदतीची सुविधा २४ तास उपलब्ध असते आणि यामुळे तुम्हाला तुमच्या पालकांची आणि घरातील वृद्धांची चिंता करण्याची गरज नाही. एक बटन दाबल्यावर लगेच ही सेवा उपलब्ध होते.

काही वैद्यकीय सेवांच्या आधारे तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा नर्सशी त्वरित संपर्क साधू शकता. काही प्रणाली अशा तऱ्हेने बनविलेल्या असतात ज्यांच्या आधारे तुम्ही घराबाहेर असलात तरीसुद्धा एका बटणाच्या क्लिकवर तुम्हाला तात्काळ मदत मिळू शकते. तुमच्या गरजेनुरूप कोणती प्रणाली वापरणे योग्य आहे ते ठरवा.

या तात्काळ मदत उपलब्ध करून देणाऱ्या प्रणालीमुळे आता ज्येष्ठ नागरीकांना चिंता करण्याची काहीच गरज नाही.

Also Read: Emergency Numbers for Seniors in India

Read this here in English

 

 

Ask a question regarding ज्येष्ठांच्या घरातील आणि घराबाहेरील सुरक्षेसाठी ३ प्रभावी उपाययोजना

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here