2 MIN READ

अंगात ताप असणे हे तुमची रोगप्रतिकारक व्यवस्था व्यवस्थित काम करत नसल्याचे लक्षण आहे. रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणाशी लढा देत असते. ज्येष्ठांमध्ये रोगाचे संक्रमण आणि ताप मोठया प्रमाणात आढळून येतात; पण यासाठी चिंता करण्याचे काही कारण नाही. 

तापासाठी घेतलेल्या गोळ्या शरीराचे तापमान झटकन कमी करतात. काही वेळा जर जास्त ताप असेल तर गोळ्या घेण्यास हरकत नाही. कमी तापामध्ये काही नैसर्गिक उपाय वापरून गोळ्या न घेता ताप नियंत्रणात आणता येतो. यामुळे रोगप्रतिकारक व्यवस्था ताप आतून कमी करण्याचे तिचे काम व्यवस्थित करू शकते. 

खालील नैसर्गिक उपाय ताप घालवण्यास मदत करतात:

  1. पाणी: पाणी हे जीवन आहे असे म्हणतात. शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी, जंतूंचा नायनाट करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातून घामावाटे बाहेर जाणाऱ्या पाण्याची कमतरता भासत नाही आणि समतोल राखला जातो. इलेक्ट्रोलाइट्स किंवा फळांचा रस पिऊनसुद्धा शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.
  2. आले आणि लसूण: प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात हमखास आढळणाऱ्या आले आणि लसूण यांमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुणधर्म असतात. जर सर्दी-ताप असेल तर आले आणि लसूण कामी येतात. गरम कडधान्यांच्या आमटीला किंवा भाजीला आले आणि लसणीची फोडणी दिल्याने सर्दी कमी होते. आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी आणि ताप कमी होतो तसेच घशालाही आराम मिळतो.
  3. हळद घालून दूध: हळद सुद्धा प्रत्येक भारतीय घरात असतेच. हळदीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुणधर्म असतात. रोग असो वा जखम, हळदीने बरे झाल्याशिवाय राहत नाही. पाश्चात्य देशांनीसुद्धा हळदीचे महत्त्व आता ओळखले आहे. आयुर्वेदात हळदीचे कित्येक उपयोग नमूद केले आहेत. तापातसुद्धा १ कप दुधात पाव चमचा हळद घालून दूध प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि सर्दी कमी होतो. यात साखरेऐवजी गोड चवीसाठी मधाचा वापर करतात. मधसुद्धा घशाच्या विकारावर उपायकारक ठरतो.
  4. तुळस: ‘तुळस’ हे रोप प्रत्येक घरासमोर लावल्याचे आपण पहिले आहेत. तुळस ताप उतरवण्यासाठी मदत करते. तुळशीची २० पाने, आले हे घटक २ कप पाण्यात उकळून पाणी निम्मे झाले की तो काढा जरा कडकडीत असताना प्यावा. दिवसातून २-३ वेळा हा काढा घेतला असता ताप गेलाच म्हणून समजा.
  5. आराम: तापात आरामाची नितांत गरज असते. शरीरात निसर्गतःच असलेली रोगप्रतिकारक यंत्रणा कोणतेही संक्रमण झाल्यावर ताबडतोब कामाला लागते. ही यंत्रणा किटाणूंशी जोरदार लढा देत असताना शरीराला आरामाची गरज असते. अशा वेळी जर आपण धावपळ करत राहिलो तर आपली शक्ती इतर कामांसाठी खर्ची पडते. परिणामी रोगप्रतिकारक यंत्रणा तिचे काम सुरळीत पार पाडू शकत नाही. त्यामुळे आराम करणे हेच इष्ट. 

प्रत्येकाची नैसर्गिक उपायांना प्रतिसाद देण्याची क्षमता वेगवेगळी असते पण शक्यतो हे उपाय वापरून ताप तीन दिवसांत पळून गेल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही जर ताप कोणत्याही उपायाने कमी होत नसल्याचे जाणवले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.  

हे आवर्जून वाचा7 Vegetables that can Help Keeping your Blood Sugar Levels Normal

Read this here in English

 

Ask a question regarding ज्येष्ठांसाठी ताप घालविण्याचे ५ रामबाण उपाय

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here