हे ७ उपाय करा: पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTSD) पासून मुक्ती मिळवा

पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTSD) हा विकार त्यांना होतो ज्यांनी पूर्वायुष्यात एखादी भीतीदायक गोष्ट अनुभवली आहे. अशा गोष्टींमुळे झालेला मानसिक आघात ते सहन करू शकत नाहीत आणि आयुष्यभर ते असुरक्षिततेच्या भीतीमध्ये जगत असतात. या घटनेचा अगदी खोलवर परिणाम झाल्याने ते ती घटना किंवा भीती वारंवार अनुभवतात. पाहूया या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी ७ सोपे उपाय:

0
2 MIN READ

1संमोहन

संमोहन करून मानसोपचार तद्न्य पूर्वायुष्यात अनुभवलेली घटना पुन्हा-पुन्हा  पाहून रुग्णाला भीतीदायक घटनेशी सामना करण्यास भाग पाडतात. तसेच रुग्णाचे हे अनुभव वेळोवेळी नमूद केले जातात.

2एक्पोजर आणि कॉग्निटिव थेरपी

पूर्वायुष्यातील घटनांचा आघात खोलवर झाल्याने रुग्णाच्या मनात पश्चात्ताप, अपराधी वाटणे, स्वतःला दोष देणे, भविष्याची चिंता असल्यास कॉग्निटिव थेरपीचा उपयोग केला जातो. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णासोबत चर्चा करून त्याला वारंवार स्वतःला माफ करण्याची आणि जीवनात पुढील वाटचाल करण्याची प्रेरणा दिली जाते.

3आय मुव्हमेंट डिसेन्सिटायझेशन आणि रिप्रोसेसिंग

या उपचार पद्धतीमध्ये  पूर्वायुष्यातील घटनांवर आधारित चित्र रुग्णासमोर ठेवले जाते. यानंतर मानसोपचार तद्न्य रुग्णाला डोळे बंद ठेवून चित्रविषयी नेमके काय वाटत आहे ते विचारतात आणि ही भीती वायफळ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत पूर्णतः रुग्णाच्या मनातून भीती नाहीशी होत नाही तोपर्यंत असे वारंवार केले जाते.

4सकारात्मक विचार

Positive Thinking किंवा सकारात्मक विचार रुग्णाला दिले जातात. जुन्या आठवणी विसरून आयुष्य नव्याने सुरु करण्याची प्रेरणा दिली जाते.

5टॉक थेरपी 

जर दीर्घकाळापर्यंत रुग्ण पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरचा (PTSD) सामना करत असेल, तर त्याच्याशी संवाद साधून, धीर देऊन रुग्णाच्या मनातून भीती नाहीशी केली जाते.

6औषधे

जर पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरचा (PTSD) फार त्रास होत असेल तर रुग्णाला अँटीडिप्रेसंट्स (निराशा दूर करणारी औषधे) दिली जातात. यामुळे तणाव नाहीसा होऊन चांगली झोप लागते. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

7योग आणि मेडिटेशन (विपश्यना)

मनःशांती अनुभवण्यासाठी योग (Yoga) आणि मेडिटेशन (Meditation) अत्यंत उपयोगी ठरते. यामुळे मनुष्य तणावविरहित जीवन जगू शकतो.

Ask a question regarding हे ७ उपाय करा: पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTSD) पासून मुक्ती मिळवा

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here