2 MIN READ

आपली त्वचा बाहेरील वातावरणाच्या दुष्परिणामांना तोंड देत असते. सूर्य, वारा, प्रदूषण आणि आपल्या सवयी हे घटक त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतात. परिणामी त्वचा निस्तेज, कोरडी आणि सुरकुतलेली दिसते. वयोमानानुसार त्वचेतील लवचिकता देखील कमी होते.

तुमची त्वचा किती लवकर वृद्धत्वाकडे ढळते हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जीवनशैली, सवयी, आहार, अनुवंशिकता हे घटक तर असतातच पण त्याचबरोबर उष्णता, दूषित हवा, त्वचेखालील चरबी घटणे, तणाव, लठ्ठपणा आणि झोपण्याच्या सवयी ही सुद्धा त्वचा वृद्ध होण्यामागील कारणे असू शकतात.

उतारवयात त्वचेत होणारे बदल

उतारवयात त्वचा जीर्ण झाल्याची चिन्हे दिसू लागतात. हे कालौघात होणारे नैसर्गिक बदल असतात.

 • रुक्ष त्वचा
 • त्वचेवरील गाठी
 • त्वचा सैल पडणे
 • उपकला उतींच्या पातळ होण्यामुळे त्वचा पारदर्शक होणे
 • त्वचेच्या वरील आणि आतील आवरण जवळ आल्याने त्वचा सहज फाटणे
 • रक्तवाहिन्या पातळ झाल्याने लवकर जखम होणे

हे आवर्जून वाचा12 Ways Men Can Keep Their Skin Healthy

उतारवयात त्वचेच्या आतील भागांत होणारे बदल

त्वचेत फक्त वरच्या थरांत नाही तर आतल्या थरांतही वयोमानानुसार बदल होत जातात. गाल, हनुवटी, नाक आणि डोळ्यांखालील त्वचेच्या आतील भागातील चरबी कमी होते. यामुळे चेहऱ्यावरील हाडे दिसू लागतात. साठीनंतर चेहऱ्यावरील त्वचा सैल पडते आणि नाकाचा शेंडा खाली आल्यासारखा दिसतो.

उन्हामुळे त्वचेत कोणते बदल होतात?

त्वचा म्हातारी दिसू लागण्यामागे ऊन हे सर्वांत मुख्य कारण आहे. सूर्याच्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेतील फायबर इस्लास्टीन जे त्वचेला घट्ट धरून ठेवते ते या उन्हामुळे त्वचा सैल सोडू लागते. यामुळे त्वचेवर पटकन जखम होण्याची शक्यता वाढू लागते. तसेच एकदा झालेले घाव भरून निघण्यासही बराच वेळ लागतो. तरुणपणात त्वचेला झालेले नुकसान दिसून येत नाही. ते वृद्धापकाळात प्रकर्षाने जाणवू लागते.

सूर्याने त्वचेचे केलेले नुकसान भरून न निघण्यासारखे असते. परंतु ते नियंत्रणात आणता येऊ शकते. त्वचा स्वतःला हळूहळू पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करत असते. लेजर ट्रीटमेंटने त्वचा पूर्ववत होऊ शकते. सनस्क्रीन लोशन लावणे, सनकोट आणि स्कार्फ किंवा टोपीने त्वचा झाकणे किंवा सूर्य मावळतीला आल्यावर घराबाहेर पडणे असे काही उपाय आपल्याला नक्कीच या संभाव्य नुकसानापासून वाचवू शकतील.

हे आवर्जून वाचाFive tips for fabulous skin post 60

त्वचा कोरडी होण्यामागील इतर करणे

चेहऱ्यावरील हावभाव, झोपण्याच्या पद्धती आणि गुरुत्वाकर्षण या गोष्टींमुळे त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली होते. दारू आणि सिगारेटसारख्या व्यसनांमुळे हळूहळू त्वचा कोरडी होत जाते. जिवणी (ओठांचा आणि हनुवटीचा भाग), डोळे या अवयवांच्या आजूबाजूची त्वचा सुरकुतणे, खरखरीत आणि रुक्ष त्वचा ही कोरड्या त्वचेची उदाहरणे आहेत.

उतारवयातही त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टिप्स

 1. त्वचा स्वच्छ ठेवा आणि ओलावा राखा: त्वचेला स्वच्छ ठेवण्याकरिता सुगंधी किंवा अल्कोहोल मिश्रित बॉडी क्लींजर्स वापरण्याऐवजी नैसर्गिक क्लींजरचा वापर करा. ग्लिसरीन किंवा जोजोबा ऑइल असलेले क्लींजर्स त्वचा कोरडी पडू देत नाहीत. त्याचप्रमाणे अंघोळीनंतर त्वचेत लगेच मुरेल असा मॉइस्चराइजर वापरा.
 2. कोमट पाण्याने चेहरा धुवा:  गरम पाण्याने त्वचा कोरडी पडते त्यामुळे तिला ताजेतवाने ठेवण्यासाठी चेहरा धुताना किंवा अंघोळ करताना कोमट पाणी वापरा. 
 3. साबण वापरणे टाळा: साबण त्वचेतील आर्द्रता नाहीशी करतो त्यामुळे साबण वापरणे टाळा.
 4. सनस्क्रीन वापराघराबाहेर पडण्याआधी जास्त SPF असलेली सनस्क्रीन उघड्या त्वचेवर लावा. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होईल. 
 5. उन्हात बाहेर पडणे टाळा: सकाळचे कोवळे ऊन जरी त्वचेला पूरक असले तरी प्रखर ऊन तितकेच घातक असते. जर अपरिहार्य कारणास्तव उन्हात बाहेर पडावेच लागले तर स्कार्फ, हॅट, सनकोट किंवा छत्रीचा वापर करा. सूर्यामुळे त्वचा टॅन होते म्हणजेच काळी पडते.
 6. भरपूर पाणी प्या: पाणी तुमच्या त्वचेला तजेलदार राहण्यास मदत करते. दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
 7. धूम्रपान टाळा: धुम्रपानामुळे त्वचा लवकर कोरडी पडते. धूम्रपान केवळ त्वचेसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठीच घातक आहे.
 8. त्वचातज्ज्ञाची भेट घ्या: उतारवयात त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी पडते. जर तुम्हाला असे वाटत असेल की भरपूर काळजी घेऊनसुद्धा त्वचा कोरडी पडत आहे तर त्वचातज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

हे आवर्जून वाचा: Home remedies for skin tightening

Read this here in English

Ask a question regarding उतारवय आणि कोरडी त्वचा: हे जाणून घ्या

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here