ज्येष्ठांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत करणारी ५ ॲप्स

वृद्धावस्थेत स्मार्टफोनच्या मदतीने आपले आरोग्य जपणे आता झाले आहे आणखीनच सोपे. चला पाहूया काही मोबाईल ॲप्स जी फिट राहण्यासाठी मदत करतात. ॲपल स्टोर आणि गुगल प्लेस्टोर वर उपलब्ध आहेत ही अँड्रॉइड ॲप्स:

0
2 MIN READ

ॲप्टिव्ह: नं.१ ऑडिओ फिटनेस ॲप (Aaptiv: #1 Audio Fitness App)

या  ॲपमध्ये आहेत वैयक्तिक प्रशिक्षण देणारे १५ प्रशिक्षक आणि २,५००पेक्षा अधिक ध्वनिमुद्रित मार्गदर्शनपर व्याख्याने. शर्यतीत भाग घेणे, वजन कमी करणे या प्रकारचे उद्दीष्ट असल्यास हे  ॲप्लिकेशन तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे आहे. मशीनच्या मदतीने किंवा मशीनशिवाय व्यायाम कसा करावा याचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन या ॲप मध्ये उपलब्ध आहे.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

कॅलोरी काउंटरमाय फिटनेस पाल (Calorie Counter – MyFitnessPal)

या ॲपद्वारे वजन कमी करणे, शरीर लवचिक बनविणे या मुख्य उद्दीष्टांवर लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी तुम्ही काय खाता आणि त्यातून किती कॅलरीज मिळतात याचा आढावा घेतला जातो. तुमच्या वयानुरूप तुम्ही किती पाणी पिता, कधी खायला हवे, काय खायला हवे यासाठी वेगवेगळे रिमाइंडर्स (अलार्म्स) लावता येतात. यात उपलब्ध असलेल्या बारकोड्सच्या साहाय्याने तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खरेदी करता येतात आणि तुम्ही तुमच्या मनपसंत पदार्थांची नावे आणि पाककृती यात जतन म्हणजेच सेव्ह करू शकता.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

रॅनटॅस्टिक (Runtastic Running App & Fitness Tracker)

लठ्ठपणावर सर्वोत्तम उपाय म्हणजे धावणे. धांवण्याने कॅलरीज पटकन बर्न होतात. रॅनटॅस्टिक तुम्ही किती धावलात हे तर सांगतेच परंतु हे अँप्लिकेशन चालू असताना यातील उत्साहवर्धक गाणीसुद्धा कानात हेडफोन्स घालून ऐकता येतात. धावणे चालू करण्याअगोदर वॉर्मअप करणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी या  ॲपमध्ये प्रशिक्षण सत्र पाहता येते. तुम्ही एखाद्या ठराविक कालावधीत धावण्यात किती प्रगती केली याचा आढावा या ॲपद्वारे घेता येतो.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

स्वर्किट (Sworkit Fitness – Workouts & Exercise Plans App)

यात लठ्ठपणा कमी करण्यासाठी ६ आठवड्यांचे लक्ष्य तुम्हाला पूर्ण करता येते. यासाठी तुम्ही या सहा आठवड्यांत कोणकोणत्या व्यायामप्रकारांचा अवलंब करायचा यासाठी या ॲपमध्ये प्रशिक्षण सत्र पाहता येते. तुम्ही दिवसातून किती वेळ आणि कोणता व्यायाम करता यावरून हे लक्ष्य आपोआप बदलते. या ॲपला तुम्ही स्त्रावा, ॲपल फिटनेस ॲप, माय फिटनेस पाल या ॲप्ससोबत संलग्न करू शकता.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

योगा स्टुडिओ (Yoga Studio: Mind & Body)

यात ७० पेक्षाही जास्त योगासनांचे व्हिडीओज आणि २८० पेक्षाही जास्त योगासने आहेत. ऑडीओच्या साहाय्याने योगासने करता येतात. तसेच तुमच्या स्मार्टफोनमधील कॅलेंडर या ॲपसोबत संलग्न करून आपले वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करता येते. ज्यांनी नुकतीच योगासनांना सुरुवात केली आहे, अशांसाठी सोपी योगसानेसुद्धा या ॲपमध्ये दिली आहेत.

डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Ask a question regarding ज्येष्ठांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत करणारी ५ ॲप्स

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here