हे पदार्थ खाल्ल्यास वृद्धापकाळातही तरतरीत राहील मेंदू

मेंदूचे वय जसजसे वाढते तसतसा त्याच्या कार्याच्या गतीवर परिणाम होतो. मेंदूवर होणाऱ्या वयाच्या परिणमामुळे स्मृतिभ्रंश, अल्झायमर, नैराश्य इत्यादी आजार उद्भवतात. परंतु, चांगल्या आहाराच्या मदतीने मेंदूचा समतोल राखता येतो. चला पाहूया मेंदूचे उत्तम आरोग्य कसे राखता येईल.:

0
3 MIN READ

1ओट्स

ओट्स (Oats) एक अतिशय पौष्टिक आणि पोटभरीची डिश आहे. न्याहारीसाठी ओट्सचा बाउल आपला दिवस उत्तम बनवू शकतो. हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही मेंदूच्या स्वास्थ्यासाठी देखील चांगले आहे. पौष्टिक आहारामुळे ऊर्जेच्या पातळीत वाढ होते. ओट्समुळे वृद्धांमधील स्मरणशक्ती सुधारण्यास होते. दूध किंवा पाण्यात ओट्स शिजवून त्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर किंवा मसाले घाला.

 

2अक्रोड

अक्रोड (Walnuts) मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी उत्तम खाद्य म्हणून ओळखले जाते. यामध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिडस्, फायबर आणि व्हिटॅमिन ई हे घटक असतात, जे मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असतात. चावायला मऊ असल्याने वृद्ध लोक ते सहजपणे खाऊ शकतात. आपण त्यांना शिरा, हलवा किंवा दुधाच्या शेकमध्ये देखील मिसळून खाऊ शकता.

 

3बदाम

बदामांमध्ये (Almonds) व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ईचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात आणि स्मरणशक्ती तीव्र ठेवतात. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता तसेच बदाम भाजून त्याची पावडर बनवू शकता आणि ते दुधात मिसळू शकता. काही लोक बदामाची पावडर बनवतात आणि चपाती किंवा भाकरीच्या पिठामध्ये मिसळतात.

 

4पालक

हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फोलेट आणि व्हिटॅमिन बी 12 असते. या घटकांचे सेवन केल्याने स्मृतिभ्रंशाचा धोका टाळता येतो. पालक (Spinach) एक अशी भाजी आहे जी डाळ, पराठा, भाजी किंवा भजीमध्ये घालता येते. पालक सूप आणि स्मूदी हे पदार्थ देखील बनवता येतात.

 

5हळद

हळद (Turmeric) पावडर सामान्यतः भारतीय स्वयंपाकघरात आणि देवाच्या पूजेमध्ये वापरली जाते. बरेच लोक हळदीची भाजी करतात आणि त्याचे लोणचे किंवा कोशिंबीर बनवली जाते. हळदीतील मुख्य घटक कर्क्यूमिन थेट मेंदूत प्रवेश करतो ज्याचा स्मरणशक्तीला फायदा होऊ शकतो. हळदीत अँटीऑक्सीडेंट्स तसेच अँटी-इंफ्लेमेटरी (जखम भरणारे) गुणधर्म आहेत. वृद्धजनांची स्मृती सुधारण्यासाठी आणि नैराश्याची तीव्रता कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

6अंडी

मेंदूच्या आरोग्यासाठी अंडी (Eggs) खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये बी 6 आणि बी 12, फोलेट आणि कोलीन असते. आपल्या शरीरात कोलीन खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण त्याचा मूड आणि स्मरणशक्ती नियंत्रित करणार्‍या न्यूरोट्रांसमीटर ॲसिटीलकोलीनच्या उत्पादनावर परिणाम होतो. कोलीन बर्‍याचशा पदार्थांमध्ये नसते. कोलीन अंड्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. अंड्यातील इतर पोषक गोष्टींमुळे वृद्धांच्या मेंदूचे आरोग्य कायम राहते. अंडी उकळून, ऑम्लेट किंवा भुर्जी बनवून खाता येतात. आपल्याला हवे असल्यास आपण अंडी कच्चीदेखील खाऊ शकतो.

7 संत्री

संत्रे (Oranges) व्हिटॅमिन सी ने समृध्द असते, जे मेंदूला निष्क्रिय होण्यापासून रोखण्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे. आहारात व्हिटॅमिन सी ने युक्त पदार्थांचा समावेश करून आपण वृद्धत्वामुळे होणारे मेंदूचे आजार टाळता येतील. संत्री खाल्ल्याने अल्झायमर रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Ask a question regarding हे पदार्थ खाल्ल्यास वृद्धापकाळातही तरतरीत राहील मेंदू

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here