वृद्धजनांना सर्वसामान्यपणे होणारे श्वसनाचे विकार

शरीराच्या बाह्य भागावर जशा वय वाढल्याच्या खुणा दिसतात, त्या आपण पाहू शकतो. तसे आपण शरीराच्या आत काय चालू आहे ते पाहू शकत नाही. श्वसनसंस्था हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे. श्वसनसंस्थेतील फुफ्फुसे आणि छातीचा पिंजरा यांच्यावर सुद्धा वयोमानामुळे परिणाम होतो. फुफ्फुसांचे स्नायू कमजोर होतात त्यामुळे श्वसनप्रक्रिया नीट होत नाही. छातीचा पिंजरा आकुंचन पावतो आणि आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसे प्रसरण पावू शकत नाहीत. चला पाहूया, वृद्धजनांना सर्वसामान्यपणे होणारे श्वसनाचे विकार :

0
3 MIN READ

1. क्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS)

फुफ्फुसांमधील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना धक्का पोहोचल्याने तेथील हवेच्या कोशिकांमध्ये पाणी भरते. त्यामुळे शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचवण्याच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी शरीराचा एखादा भाग निकामी होऊ शकतो.

ARDS अशी अवस्था आहे जी रक्त किंवा फुफ्फुसांमध्ये संक्रमण, छातीत किंवा डोक्यावर होणारे घाव, विषारी पदार्थांशी संपर्क आल्यास होते. आधीपासून आजारी किंवा मानसिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांना हा विकार होतो. फुफ्फुसांमधील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना धक्का पोहोचल्याने तेथील हवेच्या कोशिकांमध्ये पाणी भरते. त्यामुळे शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचवण्याच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी शरीराचा एखादा भाग निकामी होऊ शकतो.

2. अस्थमा

ज्येष्ठांमध्ये अस्थमाचे निदान करणे कठीण असते कारण अस्थमाची लक्षणे जवळपास  क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजच्या लक्षणांशी मिळतीजुळती असतात

असे म्हणतात की अस्थमा खासकरून लहान मुलांमध्ये आढळतो. पण ज्येष्ठांमध्येही ही एक गंभीर समस्या आहे. श्वास घेताना अडथळा, खोकला, छातीत हलके वाटणे ही अस्थमाची लक्षणे आहेत. ज्येष्ठांमध्ये अस्थमाचे निदान करणे कठीण असते कारण अस्थमाची लक्षणे जवळपास  क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजच्या लक्षणांशी मिळतीजुळती असतात. जर यावर लवकर उपचार झाले तर तुमची श्वसनसंस्था यातून व्यवस्थित बरी होऊ शकते.

3. क्रोनिक ब्रोंकाइटिस

प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्याने क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचा सामना करावा लागतो.

क्रॉनिक ब्रॉन्कायटिस  क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजच्या श्रेणीतील एक विकार आहे. यात श्वसनलिकेला सूज येते आणि त्याच्यावर चिकट द्रव तयार होतो. त्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. श्वास घेताना त्रास होणे, खोकला, घशात खवखव ही क्रॉनिक ब्रॉन्कायटिसची सामान्य लक्षणे आहेत. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो पण जर वृद्धजनांना झाला तर गंभीर स्वरूप धारण करू शकतो. प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्याने क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचा सामना करावा लागतो.

4. अँफीसेमा

आलव्हिओलाय म्हणजेच हवेच्या कोशिकांची आतील भिंत नाजूक होते आणि त्या फुटतात. या कोशिकांच्या जागी हवेची एक मोठी पिशवी तयार होते. त्यामुळे फुफ्फुसांचे पृष्ठफळ कमी होते. परिणामी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

अँफीसेमा हा एक क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजच्या श्रेणीतील विकार आहे. यात आलव्हिओलाय म्हणजेच हवेच्या कोशिकांची आतील भिंत नाजूक होते आणि त्या फुटतात. या कोशिकांच्या जागी हवेची एक मोठी पिशवी तयार होते. त्यामुळे फुफ्फुसांचे पृष्ठफळ कमी होते. परिणामी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.

अँफीसेमाचा विकार असणारे लोक जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा फुफ्फुसांतील खराब झालेल्या हवेच्या कोशिकांमध्ये जुनीच हवा अडकून राहते. त्यामुळे नवीन ऑक्सिजनयुक्त हवा आत येण्यास जागा उरत नाही. अँफीसेमा झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये क्रॉनिक ब्रॉन्कायटिसचेही निदान होते. श्वास घेताना त्रास होणे, खोकला इ. लक्षणे यात आढळतात. या लक्षणांमुळे हृदयविकार, फुफ्फुसांत छिद्रे अशा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते

5. इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस (IPF) 

इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस हा आजार फुफ्फुसांच्या ऊतींना सूज आल्यामुळे होतो.

इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस हा आजार फुफ्फुसांच्या ऊतींना सूज आल्यामुळे होतो. वृद्धांमध्ये हा विकार मोठ्या प्रमाणात आढळतो. खोकला किंवा थकवा येणे ही या विकाराची लक्षणे आहेत. सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या या लक्षणांमुळे या आजाराचे निदान करणे कठीण जाते. परंतु निदान झाल्यानंतर ५ वर्षांच्या वर जिवंत राहू शकणाऱ्या रुग्णांचे २०-३० टक्के इतकेच प्रमाण आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या फायब्रॉसिस चा विकास नियंत्रणात आणता येऊ शकतो.

6. प्लुरल मेसोथेलियोमा

फुफ्फुसांशी निगडीत समस्यांपासून वाचण्यासाठी व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. धूम्रपानाने फुफ्फुसांचे विकार जोमाने बळावतात.

‘एस्बेस्टोस’ नावाच्या एका घटकाच्या संपर्कात आल्यामुळे होणारा ‘प्लुरल मेसोथेलियोमा’ हा कॅन्सर आहे. या कॅन्सरचा विकास होण्यास अनेक वर्षे लागतात. पूर्ण विकसित झाल्यावर श्वास लागणे, खोकल्याची उबळ येणे, आवाज बसणे, फुफ्फुसांमध्ये पाणी अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर २ वर्षांच्या आताच रुग्णाचा मृत्यू ओढवतो.

फुफ्फुसांशी निगडीत समस्यांपासून वाचण्यासाठी व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. धूम्रपानाने फुफ्फुसांचे विकार जोमाने बळावतात.

Ask a question regarding वृद्धजनांना सर्वसामान्यपणे होणारे श्वसनाचे विकार

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here