2 MIN READ

शरीरातील अन्य समस्यांमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठांमध्ये मधुमेह , उच्च रक्तदाब , हृदयरोग आणि स्ट्रोक किडनीसाठी नुकसानकारक ठरतात. किडनी जर अकार्यक्षम झाली असेल तर अशा वेळी किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो.

अवयव प्रत्यारोपण ही वैद्यकीय तंत्रज्ञानाची सर्वांत मोठी भरारी आहे. प्रत्यारोपणामुळे जगभरातील बर्‍याच रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. इतर अवयवांच्या तुलनेत किडनीच्या प्रत्यारोपणाची सर्वाधिक गरज पडते. गेल्या ४५ वर्षांपासून, भारतात किडनी प्रत्यारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला आहे. खरं तर, यासाठी भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९५ पासून मृत व्यक्तीच्या शरीरातील किडनीचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे..

किडनी प्रत्यारोपणाची गरज ओळखून आता पुष्कळ लोक किडनी दान करण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु, अवयवांची मागणी आणि पुरवठा यातील फरक ही चिंतेची बाब आहे. अवयवदानाची कमतरता ही आता जागतिक स्तरावर एक मोठी समस्या आहे. मुख्यत्वेकरून मृतांच्या किडनी हा प्रत्यारोपणासाठी केल्या जाणाऱ्या पुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहे आणि माणसा आयुष्यमानात वाढ झाल्यामुळे हा पुरवठा आपोआप कमी झाला आहे.

२०१३च्या एका अभ्यासानुसार  रस्त्यांवरील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या  १,३७,५७२ होती. जगातील एकूण मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण १.१% आहे. अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये मृत्यू डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे ओढवला आहे. अशा वेळी त्या मृत व्यक्तीची किडनी प्रत्यारोपणासाठी वापरता येते. जरी यातील ५-१०% लोकांनी अवयव दानासाठी अर्ज भरले असते तर मागणी आणि पुरवठा यांतील अंतर भरून निघाले असते.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी आव्हाने

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मृत अवयवदात्यांचे प्रमाण दहा लाखांपैकी ०.३४ इतकेच आहे. इतर देशांतील अवयवदानाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. भारतात अवयवदानाचा निर्णय घेताना धार्मिक आणि मानसिक भावनांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे ही तफावत आढळते. अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता नसणे हे देखील एक कारण आहे. खरे आकडे पाहता, ८०.१% लोक जनजागृतीच्या अभावामुळे, ६३.४% लोक धार्मिक परंपरा आणि अंधश्रद्धा यामुळे अवयवदान करणे टाळतात तसेच  ४०.३% लोकांचा भारतीय आरोग्य सेवांवर विश्वास नसल्याने ते अवयवदानास नकार देतात.

जे लोक उच्च शिक्षित आहेत त्यांनी अन्य लोकांना ‘ब्रेन डेड’ (निष्क्रिय मेंदू असलेल्या) व्यक्तीच्या एका किडनीचे दान करण्याविषयी प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रामीण भागात प्रशिक्षित नसलेले कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव गोष्टींमुळे बहुसंख्य लोकांमध्ये प्रत्यारोपणाच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. बातम्यांमधून किडनी ट्रान्सप्लांटेशनविषयी जी चुकीची माहिती पसरविली जात आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीक अवयवदानासाठी पुढे येत नाहीत.

हे आवर्जून वाचा: वृद्धपकाळात मधुमेहामुळे किडनीवर होतो का परिणाम?

आशेचा किरण

किडनीदानाच्या प्रक्रियेत इतके अडथळे असून देखील भारत सरकार मागणी आणि पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. ‘अवयवदान ते प्रत्यारोपण’ यात समाविष्ट असलेल्या प्रक्रियांसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.  सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने प्रत्यारोपण आता सोपे झाले आहे. गेल्या काही वर्षांत संपूर्ण भारतात किडनीचे दान करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. MOHAN (मल्टी-ऑर्गन हार्वेस्टिंग आणि नेटवर्किंग) ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी १९९७ पासून या क्षेत्रात कार्यरत आहे . सन २००० मध्ये इंडियन नेटवर्क फॉर ऑर्गन शेयरिंग (आयएनओएस) सुरू करण्यात आले ज्यामुळे किडनीदानाच्या प्रक्रियेचे केंद्रीकरण करण्यात आले. प्रत्येक आरोग्य केंद्रात नेमलेले समन्वयक किडनीदानाविषयी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना माहिती देतात. तसेच त्यासाठी संमती मिळविण्याचा प्रयत्न करतात.

NOTTO (नॅशनल ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन) ही एक राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे जी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या डिरेक्टोरेट जनरल हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत काम करते. अवयवदान, साठा, प्रत्यारोपणापर्यंतची वाहतूक आणि प्रत्यारोपण या प्रक्रिया NOTTO द्वारे केंद्र स्तरावर पार पाडण्यात येतात.

ग्रीन कॉरिडोर (जिथे प्रत्यारोपणासाठी अवयव वाहून नेणारे वाहन थांबविले जात नाही) आणि टिश्यू बँक (जिथे किडनी आणि इतर अवयव क्रायोजेनिक अवस्थेत साठविले जातात) या सुविधा सुलभ प्रत्यारोपण करण्यासाठी पुरविल्या जात आहेत.

निष्कर्ष

भारतात किडनी प्रत्यारोपणाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे या विषयाबाबत जागरूकता वाढविण्यात मदत करण्यासाठी आणि किडनी दान करण्यास बरेच लोक पुढे येत आहेत. लवकरच मागणी आणि पुरवठ्यातील अंतर कमी करण्यात सरकारला यश येईल.

हे आवर्जून वाचा: किडनी प्रत्यारोपण आता होणार स्वस्तात 

Ask a question regarding भारतात किडनी प्रत्यारोपणाची सद्यस्थिती

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here