1 MIN READ

भ्रम म्हणजे काय?

डिल्यूजन (Delusion) किंवा भ्रम हा एक असा मानसिक विकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काल्पनिक आणि वास्तविक गोष्टींमध्ये फरक समजू शकत नाही. भारतात, ३५ ते ४० टक्के लोकांना भ्रम हा मानसिक विकार आहे. अनेक मानसिक आजारांमध्ये भ्रम रोग आढळतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एका महिन्यापेक्षा जास्त काळ, एक किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींचा आभास होतो त्याला भ्रम रोग म्हणून ओळखले जाते.

भ्रमात असताना, एखाद्याला असे वाटते की शरीराच्या आतून काहीतरी चावत किंवा टोचत आहे किंवा त्याच्याविरूद्ध कट रचला जात आहे. अशा व्यक्ती बर्‍याचदा शरीरावर खाजवताना दिसतात. तसेच त्यांच्या मित्रांवर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवणेही बंद करतात. सुरुवातीला डिमेंशियाचे रुग्ण सामान्य आयुष्य जगतात, परंतु काही वर्षानंतर या सवयी त्यांच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणतात. आपण डिमेंशिया किंवा भ्रम रोगाची लक्षणे पाहू:

  • सर्वांपासून अलिप्त राहणे/ एकलकोंडेपणा 
  • क्षुल्लक गोष्टींवरून वाद
  • विचित्र सवयी (उदा. खाजवत राहणे)
  • ऑफिसमध्ये विक्षिप्तपणे वागणे
  • सामाजिक संबंधांमध्ये समस्या

हे आवर्जून वाचा: हे पदार्थ खाल्ल्यास वृद्धापकाळातही तरतरीत राहील मेंदू

भ्रम रोगावर उपचार 

जर आपल्या घरातील वृद्धांमध्ये अशी मानसिक स्थिती आढळून आली असेल तर त्यांना त्वरित उपचारांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. काही प्रश्न विचारून, रुग्णाच्या प्रतिसादावर आधारित विश्लेषणांवरून मानसोपचार तज्ज्ञ हे सांगू शकतात की, रुग्ण भ्रम रोगाच्या कोणत्या अवस्थेत आहे. या मनोवैद्यकीय तपासणीवर आधारित उपचार आणि औषधे घेतल्यास भ्रम रोग बरा होऊ शकतो. 

मानसोपचार:

मनोचिकित्सेमध्ये, रुग्णाला सुरक्षिततेची जाणीव करून दिली जाते आणि रुग्णाला नेमके काय जाणवते जाते ते विचारले जाते. मनोचिकित्सेच्या वेळी, कुटुंबातील इतर सदस्यांना भ्रम रोगाबद्दल माहिती देऊन रुग्णाबरोबर चांगले वागण्याचा सल्ला दिला जातो.

औषधे:

या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी शरीरातील न्यूरोट्रान्समीटर्सना (Neurotransmitters) कार्यक्षम करणारी औषधे दिली जातात.

भ्रम रोगात, रुग्णाला अधिक प्रेम आणि विश्वास आवश्यक असतो. अशा रुग्णांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. जर भ्रमाची सुरुवातीची लक्षणे दिसू लागली तर तातडीने न्यूरोलॉजिस्ट किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या प्रियजनांना भ्रमरोगामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवा. 

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांमध्ये एकाकीपणातून जन्म घेतेय मानसिक विकृती

Ask a question regarding डिल्यूजन (Delusion) किंवा भ्रम रोग बरा होतो का?

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here