2 MIN READ

तुम्हाला माहित आहे का की शरीरातील ऊर्जा किंवा एनर्जी वापरूनच रोग निवारण करता येते? एनर्जी हीलिंग (Energy Healing) म्हणजे उतारवयात शरीरातील अशुद्धी काढून टाकणे आणि स्वतःच रोगनिवारण करण्याची शरीराची क्षमता वाढवणे. या उपचार प्रणालीबद्दल लोकांचे भिन्न विचार  आहेत.

चला पाहूया एनर्जी हीलिंगचे ४ विविध पैलू:

1पौराणिक काळापासून सुरु आहे एनर्जी हीलिंग

रेकी एक प्राचीन जपानी वैज्ञानिक वैद्यकीय प्रणाली आहे जी विसाव्या शतकाच्या पहिल्या काही वर्षांत म्हणजेच १०० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी जन्मास आली होती. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये शरीराच्या ७ उर्जा चक्रांबद्दल सविस्तर माहिती आहे. अ‍ॅक्यूपंक्चरवर आधारित बर्‍याच वर्षांपूर्वीच्या चाईनीज उपचार पद्धतीमध्ये मेरिडियन ऊर्जा महामार्ग (एनर्जी सुपरहाइवे) सक्रिय करण्याच्या पद्धती नमूद आहेत.

या उपचार पद्धतीच्या वेगवेगळ्या नावांकडे लक्ष न देता, जर आपण त्यांच्या मूळ संकल्पनेकडे लक्ष केंद्रित केले तर आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की एनर्जी हीलिंग म्हणजे शरीराची आतील मूलभूत शक्ती जागृत करणे.

2एनर्जी हीलिंग आहे विज्ञानावर आधारित 

आपण भौतिकशास्त्रात वाचले आहे की टेबलासारख्या घन वस्तुंना स्वतःचे व्हायब्रेशन म्हणजेच कंपने असतात. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातही कंपने असतात. उदा. आनंदी व्यक्ती बर्‍याच वेळा वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणते, ती व्यक्ती लोकांपर्यंत गुड व्हाइब्स (चांगली कंपने) निर्माण करते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची स्पंदने असतात तशाच प्रकारे जागेचीही स्पंदने असतात. उदा. एखाद्या घरात भांडण झाले असेल आणि नंतर आपण तेथे गेलो आणि शांतता असली तरीही तिथून लवकर बाहेर पडावे असे वाटते.

हे आवर्जून वाचा: ROमार्फत मिळते का शुद्ध पेयजल?

3एनर्जी हीलिंगसाठी अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याची गरज नाही 

ज्या प्रमाणे खाली पडण्यापूर्वी आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम जाणून घेण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे एनर्जी हीलिंगचे उपचार घेण्यापूर्वी या विषयाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. परंतु या उपचार प्रणालीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, एनर्जी हीलिंगवर विश्वास ठेवणेही महत्वाचे आहे.

एनर्जी हीलिंगचे उपचार घेण्यासाठी कोणताही रोग असणे आवश्यक नाही. जर आपण ताणतणाव किंवा चिंताग्रस्त असाल किंवा शारीरिक व मानसिक थकवा आल्यासारखा वाटत असेल तर आपण हे उपचार घेऊ शकता. परंतु आपण कोणत्याही आजारावर आधीपासूनच अ‍ॅलोपॅथीचे उपचार घेत असाल तर ते सुरू ठेवून एनर्जी हीलिंगचे उपचार घ्या.

4कधीही आणि कोठेही करा एनर्जी हीलिंग 

एनर्जी हीलिंगचे उपचार देणारे चिकित्सक कुठेही सहज सापडतात.

  • रेकी थेरपी करण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेट देण्याचीही गरज नाही. फोनवर बोलून डॉक्टर आपल्याला ऊर्जा देऊ शकतात.
  • ॲक्यूपंक्चरमध्ये, शरीरात सुयांद्वारे छिद्रे पाडली जातात. या प्रणालीमध्ये शरीराच्या विविध रक्तवाहिन्या, अवयव जागृत होतात.
  • रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये हात, पाय आणि कानांवर असलेले ऊर्जा बिंदू दाबून शरीरात ऊर्जा आणली जाते.
  • या उपायांव्यतिरिक्त, आपण मालिशच्या आधारे शरीराला चैतन्य देऊ शकतो.

एनर्जी हीलिंग ही एक पूरक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. आजकाल मोठ्या प्रमाणावर ही पद्धत अवलंबली जात आहे. उतारवयात हे केल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल.

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांसाठी ताप घालविण्याचे ५ रामबाण उपाय

Ask a question regarding वृद्धावस्थेत एनर्जी हीलिंग (Energy Healing): पाहूया विविध पैलू

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here