चाळिशीनंतर वाढणारी प्रोस्टेट ग्रंथी आटोक्यात आणण्यासाठी करा ही योगासने

भारतात प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारात वाढ होण्याची समस्या इतकी वाढली आहे की, प्रत्येक दोन पुरुषांमागे एका पुरुषाला प्रोस्टेटचा विकार झाला आहे. सुरुवातीला अक्रोडाएवढी असणारी ही ग्रंथी चाळिशीनंतर हळूहळू वाढू लागते आणि सत्तरीच्या आसपास तिचा आकार लिंबासारखा होतो. यामुळे मूत्रमार्गात अडथळे निर्माण होतात. योगशास्त्रात प्रोस्टेटची वाढ आटोक्यात आणण्यासाठी अनेक योगाभ्यास सुचविले आहेत. चला तर पाहूया, कोणती आहेत ही योगासने: 

0
2 MIN READ

1. बद्ध कोनासन

या आसनाच्या करण्याच्या पद्धतीवरून त्याचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले आहे. यात दोन्ही पावले ही जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जणू काही त्यांना एका विशिष्ठ कोनामध्ये बांधून ठेवले आहे. याचे फुलपाखरासारखे आसन असे लोकप्रिय नाव आहे कारण यामध्ये पायांची हालचाल ही फुलपाखराने पंख फडफडवण्यासारखीच होते.

2. वीरासन

प्रथम दोन्ही पाय दुमडून टाचांवर बसा. गुडघे जुळवा. या आसनाला वज्रासन असे म्हणतात. आता डाव्या पायाला उजव्या गुडघ्याजवळ आणा आणि पायाचा पंजा जमिनीवर सपाट अवस्थेत ठेवा. डावे कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवा. हनुवटीवर हात ठेवा. उजवा हात उजव्या कमरेवर ठेवा. तुमच्या शरीराचे वजन उजव्या टाचेवर येऊ द्या. मन एकाग्र करा आणि आता हेच आसन दुसऱ्या बाजूने करा.

3. सुप्त पादांगुष्ठासन

या आसनात जमिनीवर खाली झोपून एक पाय न वाकवता हवेत ९० अंशाच्या कोनात घ्या. यानंतर पावलाच्या मध्यभागी एक दोरी लावून त्या दोरीची दोन टोके दोन्ही हातांत पकडा. आता ही दोरी पोटाच्या दिशेने ओढा.

4. जानुशीर्षासन

दोन्ही पाय सरळ रेषेत लांब करून बसावे. आता डावा पाय दुमडावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेवर ठेवावी. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेल्या स्थितीत असला पाहिजे. आता हळुवारपणे शरीराच्या वरील भागास वाकवून डोके उजव्या गुडघ्याला लावावे. हातांनी उजव्या पायाचा अंगठा पकडावा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर पूर्वस्थितीत यावे  मग थोडा वेळ विश्रांती घेऊन उजव्या पायाने हे आसन करावे.

5. धनुरासन

पोटावर झोपावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता गुडघ्यापासून पाय मागे दुमडून हवेत कमरेच्या दिशेने आणावेत. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना किंवा अंगठ्यांना पकडावे. हे करताना शरीराचा वरील भाग वर उचलावा. छाती आणि डोके वर उचलावे. हात सरळ आणि ताठ ठेवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती असावी. शरीराचा वरील भाग सहजतेने जेवढा वर उचलता येईल तेवढाच वरती उचलावा. या आसनात शरीराचा पोटावर येतो.

Ask a question regarding चाळिशीनंतर वाढणारी प्रोस्टेट ग्रंथी आटोक्यात आणण्यासाठी करा ही योगासने

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here