2 MIN READ

वाढत्या वयात बऱ्याचशा शारीरिक समस्या अशा असतात ज्यांचे निवारण केवळ सर्जरी किंवा शस्त्रक्रिया केल्यानेच होऊ शकते. उत्तम आरोग्यासाठी सर्जरीनंतर रुग्णाची काळजी घेणेही आवश्यक असते. सर्जरीनंतर रुग्ण किती लवकर बरा होईल किंवा सर्जरी रुग्णासाठी किती फायद्याची ठरेल हे रुग्णाच्या आहारावर अवलंबून असते. शरीराची झालेली झीज त्वरित भरून चयापचयाच्या क्रियेत सुधारणा करण्यासाठी आहारामार्फत जास्तीत जास्त कॅलरीज घेण्याची आवश्यकता असते. जर शरीरासाठी आवश्यक तितक्या कॅलरीजचे सेवन केले नाही तर सर्जरी झाल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुम्हाला माहित आहे का, सर्जरीनंतर काय खाल्ले पाहिजे?

प्रथिने: प्रथिने किंवा प्रोटीन्स मुळे तुमची हाडे आणि स्नायू तंदुरुस्त होतात. दूध, पनीर, दही केवळ प्रथिनांचेच उत्तम स्रोत नाही तर यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. सर्वांत जास्त प्रोटीन्स अंड्यामध्ये असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार एखादी व्यक्ती कोणत्याही आरोग्य समस्येशिवाय एक अंडे नक्कीच खाऊ शकते. शेंगांमध्येसुद्धा प्रोटीन्ससोबत फायबर असते. सुक्या मेव्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अक्रोडात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. यात बी कॉम्प्लेक्स, बी ६ सारखी जीवनसत्वे त्याचप्रमाणे लोह, मॅग्नेशियम, कॉपर आणि झिंकसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. प्रोटीन्सचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढीस लागते.

व्हिटॅमिन सी: तब्येत उत्तम राहण्यासाठी उत्तम संयुक्त ऊती आणि कॉलेजनची आवश्यकता असते. त्यासाठी शरीराला ‘क’ जीवनसत्व (व्हिटॅमिन सी) मिळणे आवश्यक असते. आंबट आणि रसदार फळे, टोमॅटो, संत्री, द्राक्षे, पेरू आणि सफरचंदात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सीचा रोज आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे त्वचा आणि हाडांनादेखील उत्तम पोषण मिळते.

कॅल्शियम: जरी हाडे, दात इ. अवयव कॅल्शियमचे बनलेले असले तरीही मानवी शरीरात कॅल्शियम बनत नाही. ते आपल्याला आहारातून घ्यावे लागते. तसेच आपली हाडे सातत्याने कॅल्शियमचा वापर करत असतात. सर्जरीनंतर त्वरित आराम पडावा यासाठी कॅल्शियम फार आवश्यक असते. गहू, बाजरी, रागी, सोयाबीन, चना, कुळीथ यांसारखी धान्ये म्हणजे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. त्याव्यतिरिक्त, डाळींमध्ये मूग, चणा, राजमा आदींमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

हे आवर्जून वाचा: पालकांसाठी केअरटेकर पाहताना काय लक्षात घ्याल? 

नारळ, कांदा, कंदमुळे, गवती चहा, ऊस इ.मध्ये कॅल्शियम आढळते. डेयरीची उत्पादने उदा. दही, दूध, ताक, लोणी, तूप, पनीर, चीज इ. पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. या व्यतिरिक्त हिरव्या भाज्या, कढीपत्ता, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, काकडी, भेंडी, गाजर, टोमॅटो इ.चे सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमचा अभाव जाणवत नाही. सुक्या मेव्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यांत मनुका, बदाम, पिस्ता, टरबूज व भोपळ्याच्या बिया यांचा समावेश आहे. फळांमध्ये नारळ, सीताफळ, आंबा, संत्रे, अननस, अंजीर, केळे, खजूर, किवी यांत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते.

व्हिटॅमिन डी: व्हिटॅमिन डी किंवा ‘ड’ जीवनसत्व शरीरातील कॅल्शियमचा सुयोग्य वापर होईल याची काळजी घेते. संत्र्याचा रस, बदामाचे दूध या पदार्थांत तसेच सकाळच्या उन्हात डी व्हिटॅमिन असते.

उतारवयात सर्जरी झाल्यावर शरीराला हानी पोचवणारे कॅफिन, अल्कोहोल, जास्त साखर आणि मीठ यांपासून स्वतःला दूर ठेवा. जोपर्यंत वर दिलेली पोषक तत्वे तुमच्या शरीराला मिळावीत यासाठी डॉक्टर गोळ्या-औषधें देत नाहीत तोपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही या गोष्टी नक्कीच खाऊ शकता.

हे आवर्जून वाचा: का वाटते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना सर्जरीची भीती?

Ask a question regarding लवकर बरे होण्यासाठी सर्जरीनंतर कोणता आहार घ्याल?

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here