2 MIN READ

उतारवयात शरीर कमजोर पडत जाते. आपले अवयव आणि शरीरातील अंतर्गत अवयवांची कार्ये मंदावतात. याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते आणि त्यामुळे शरीरात रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. बॅक्टेरिया, फंगस किंवा बऱ्याचदा डास चावल्याने या संक्रमणांचा त्रास वृद्धजनांना होऊ शकतो. त्यांना आधीच्याच विकारांवर कुठलीतरी औषधे चालू असतात त्यात या संक्रमणांची भर पडते. स्वतःला या विकारांपासून वाचण्यासाठी घर स्वच्छ ठेवले पाहिजे.

खाली दिलेल्या टिप्सचा वापर केल्यास स्वतःचे घर स्वच्छ कसे ठेवावे याची तुम्हाला कल्पना येईल::

1. घर साफ ठेवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करा:

ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी असे आजार संक्रमणामुळे होतात. दूषित पाणी, रक्त किंवा हवेमार्फत यांचा संसर्ग आपल्याला होतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी खालील उपाय करावे:

  • उत्तम दर्जाचे किटाणूनाशक फरशी पुसण्यासाठी वापरावे. गरम पाण्याने फरशी पुसल्यास उत्तम.
  • हवा ताजीतवानी आणि फ्रेश ठेवण्यासाठी किटाणूनाशक एअर फ्रेेेशनरचा वापर करा.
  • पावसाळ्यात बाष्प तयार करणारे मशीन म्हणजेच ह्युमिडिफायरचा वापर करा.
  • पावसाळ्यात स्वयंपाकघरात डिस्पोजेबल कपड्याचा वापर पुसण्यासाठी करा. स्वयंपाक घरात ठेवलेला पुसण्याचा कपडा किती झपाट्याने संक्रमण पसरवतो याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. जर स्वयंपाक घरात तुम्ही पुसण्यासाठी कपडे वापरत असाल तर ते स्वच्छ धुऊन वापरा किंवा डिस्पोजेबल कपडा वापरा. मायक्रोफायबरचा कपडा कमी पाणी शोषून घेतो आणि जास्त वेळ टिकतो.

2. व्हॅक्युम क्लीनरचा उपयोग करा

कार्पेट, सोफा आणि गाद्यांमध्ये अडकलेले धुळीचे कण व्हॅक्युम क्लीनरद्वारे सहज काढता येतात. व्हॅक्युम क्लीनरचे फिल्टर्स नियमित बदलत राहा जेणेकरून तो चांगले काम करेल.

3. बाथरूम नेहमी साफ ठेवा

बाथरूम मध्ये वेगाने रोगांचे संक्रमण होते त्यामुळे बाथरूम नेहमी साफ ठेवा. उत्तम दर्जाचा बाथरूम क्लीनर वापरा. किंवा बाथरूम धुताना गरम पाण्याचा वापर करा. बाथरूम मध्ये एक हँड वॉश तर ठेवाच पण त्याचबरोबर एक कचरा कुंडीसुद्धा असू द्या.

4. आपला परिसर स्वच्छ ठेवा

आपण आपलं घर तर स्वच्छ ठेवतो पण आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो का? जर घराच्या आसपास कचरा किंवा घाण असेल तर रोगांचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने होतो. घराच्या आसपास सफाई करून घ्या तसेच कचरा अन्य ठिकाणी न टाकता एका कचर्‍याच्या बादलीत टाका.

5. मच्छरदाणी लावा

डासांमुळे डेंग्यू, मलेरिया असे रोग पसरतात. दीर्घकाळ साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची अंडी फलित होतात. डासांपासून सुरक्षेसाठी मच्छरदाणी लावा तसेच मॉस्किटो रिपेलंट क्रीमचा वापर करा.

6. पाण्याचे फिल्टर्स

तुमच्या घरातील पाण्याचे फिल्टर्स योग्य काम करत आहेत की नाही हे तपासा. शुद्ध पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वॉटर फिल्टर द्वारे शुद्ध पाणी येत आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास पाण्याचे फिल्टर बदलून घ्या. पाण्याची टाकी झाकून ठेवा तसेच बीपीए फ्री प्लास्टिक बॉटल चा वापर करा.

स्वच्छ भारत ही भारताची ओळख आणि संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

संदर्भ:

https://www.buiced.com/pages/bpa-free

Read this here in English and Hindi

Ask a question regarding उत्तम आरोग्यासाठी घराला संक्रमणांपासून कसे वाचवावे

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here