2 MIN READ

किडनी ट्रान्सप्लांटनंतर होणारा संसर्ग ही रुग्णांसाठी जास्त चिंतेची बाब असते. उतारवयात रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असते, त्यात किडनीचे कार्य नव्याने सुरु होत असते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहत असलेल्या नागरीकांसाठी किडनी ट्रान्सप्लांट नंतर झालेला संसर्ग घातक ठरू शकतो. 

भारतात होणाऱ्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचा विचार करता जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आणि विशेष म्हणजे यशस्वी झालेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण जवळजवळ १०० टक्के आहे. सरासरी विचार करता भारतात जवळपास ७,५०० किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी होतात. बऱ्याचशा देशांतील रुग्ण किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात येतात.

हे आवर्जून वाचा: किडनी प्रत्यारोपण आता होणार स्वस्तात

परंतु तरीही, सर्जरीनंतर होणाऱ्या संसर्गाची भीती ही असतेच. चला पाहूया किडनी ट्रान्सप्लांट नंतर कोणत्या संसर्गाची शक्यता असते आणि कोणत्या क्रमाने संसर्ग होतो: 

  1. मूत्रमार्गात संसर्ग: प्रत्यारोपणानंतर पहिल्या महिन्यात मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका असतो. मूत्रसंस्थेच्या विविध भागांत होणारा संसर्ग किंवा दीर्घकाळ टिकणारा संसर्ग किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरू शकतो. मूत्रमार्गाच्या संसर्गावर जर योग्य आणि त्वरित उपचार केला तर परिणामांची तीव्रता कमी करता येते. 
  2. जखमेत संसर्ग:  किडनी ट्रान्सप्लांटनंतर दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये इम्युनोसप्रेसंट्स चा समावेश असतो. आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असताना त्यात ती आणखी कमी होण्यासाठी जी औषधे दिली जातात त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या जखमा लवकर भरत नाहीत. जर जखम निर्जंतुक न करता त्यावर तसेच ड्रेसिंग केले गेले तर ती चिघळण्याची शक्यता असते. हात न धुता जखमेला स्पर्श करणे किंवा करू देणे धोक्याचे ठरू शकते. 
  3. व्हायरल संसर्ग: रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असताना टाईप १ आणि टाईप २ चे हर्पिस व्हायरस तुमच्या शरीरावर हल्ला करू शकतात. अंगावर दाद येणे आणि जननांगाला खाज सुटणे ही लक्षणे व्हायरल संसर्गात सामान्यतः आढळून येतात.
  4. न्यूमोसिस्टिस कॅरिनी न्यूमोनिया:  यालाच पीसीपी म्हणतात. किडनी प्रत्यारोपणानंतर दुसऱ्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंत कधीही आढळणारी अशी अवस्था प्राणघातक ठरू शकते. यात फुफ्फुसांना संसर्ग होतो. नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता कमी झालेल्या आणि इम्युनोसप्रेसंट्स चे सेवन करणाऱ्या रुग्णांना न्यूमोसिस्टिस जिरोव्हेसाय फंगसचा धोका असतो. 
  5. मायकोबॅक्टिरियल संसर्ग:  ट्रान्सप्लांटेशन नंतर होणाऱ्या अशा प्रकारच्या संसर्गात अत्यंत गंभीर स्थिती होण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. प्रत्यारोपणानंतर ज्यांना टीबी झाला आहे, अशा रुग्णांना या संसर्गाचा जास्त धोका असतो. वयोमानामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने आणि ती कमी करणारी औषधें घेतल्याने टीबी होण्याचा धोका बळावतो. अशा परिस्थितीत टीबीवर उपचार करताना आवश्यक असलेल्या रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव असल्याने अशा केसेस गुंतागुंतीच्या असतात. 
  6. हिपॅटायटिस बी आणि सी व्हायरसचा संसर्ग: ट्रान्सप्लांटेशन झलेल्यांपैकी १०% रुग्णांना लिव्हरच्या गंभीर स्वरूपाच्या संसर्गाचा धोका असतो. यामुळे किडनी फेल्युअर, लिव्हरचा कॅन्सर, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे आणि औषधांच्या चयापचयाचा प्रभाव कमी जास्त होणे असे संभाव्य धोके असतात. प्रत्यारोपणाची सर्जरी करण्याआधी ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यास हिपॅटायटिस बी आणि सी व्हायरसमुळे लिव्हरमध्ये संसर्ग होण्याचा धोका टळू शकतो. 

किडनी प्रत्यारोपणानंतर होणारा संसर्ग हा भारतासाठी अंत्यंत महत्वाचा विषय आहे. रोगप्रतिकार क्षमता कमी झालेल्या वृद्धांना उपचारपद्धतीचा भाग म्हणून देण्यात येणारे इम्युनोसप्रेसंट्स या संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात. ट्रान्सप्लांट नंतर नियमित तपासणी करणे आणि शरीरात होणाऱ्या लहानसहान बदलांकडे लक्ष देणे चालू ठेवल्यास तुम्हाला संसर्गाचा सामना करावा लागणार नाही आणि नवीन किडनीचे तुमच्या शरीरातील कार्य सुरळीत चालू राहील. 

हे आवर्जून वाचा: का वाटते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना सर्जरीची भीती?

Ask a question regarding किडनी ट्रान्सप्लांटनंतर होणारा संसर्ग: वृद्धांसाठी खास मार्गदर्शन   

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here