1 MIN READ
वृद्धजनांमध्ये पन्नाशीनंतर संधिवाताचा एक प्रकार म्हणजेच ऑस्टिओ आर्थरायटीसची समस्या वाढत चालली आहे. या प्रकारच्या संधिवातात सांध्यांचे कार्टिलेज एकमेकांवर घासले जातात आणि त्यांच्यातला चिकटपणा कमी होत जातो. या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. ज्या रुग्णांना मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर चा विकार असतो त्यांच्याकरिता ही शस्त्रक्रिया चिंताजनक ठरू शकते. अशा परिस्थितीत ऑस्टिओ आर्थरायटीसच्या रुग्णांना दिलासा देणारे कृत्रिम वंगण म्हणजेच ‘सिंथेटिक जॉइंट लुब्रिकंट’ आता लवकरच दवाखान्यांमध्ये दाखल होणार आहे.
 
या वंगणाचा शोध कॉर्नेल विद्यापीठातील बायोमेडिकल इंजिनिअर्सनी लावला आहे. हे कृत्रिम वंगण सांध्यांच्या मध्ये घातल्याने  ऑस्टिओ आर्थरायटीसमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळेल. याचबरोबर चालणे, पळणे यांसारख्या क्रियाही अगदी सहजरित्या करता येतील. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ‘सिंथेटिक जॉइंट लुब्रिकंट’चे परीक्षण प्रथम ऑस्टिओ आर्थरायटीसच्या त्रासातून जाणाऱ्या कुत्र्यांवर करण्यात येईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच हे रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.    
 
प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार शरीरात सांध्यांमध्ये निसर्गतः आढळणाऱ्या वंगणाला ‘ लुब्रिसीन’ असे म्हणतात. जेव्हा या लुब्रिसीनचे प्रमाण कमी होते त्यावेळी सांध्यांचे कार्टिलेज एकमेकांवर घासले जातात. हे दीर्घकाळापर्यंत झाल्याने ऑस्टिओ आर्थरायटीस हा सांध्यांचा विकार होतो. या विकारामुळे लिगामेंट फाटणे यारखे गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. 

लुब्रिसीन गुडघ्याला दोन प्रकारे वंगण देण्याचे काम करते:

  1. हायड्रोनेमिक:  उठणे, बसणे किंवा चालणे यांसारख्या गुडघ्याच्या रोजच्या क्रियांसाठी आवश्यक असे दाट वंगण शरीरात तयार होते. 
  2. बाउंडरी: धावणे, उड्या मारणे या क्रियांमध्ये हायड्रोनमिक लुब्रीसिन इकडेतिकडे पसरू शकते. ते एका जागेवर स्थिर राहावे आणि सांध्यांसोबत  कार्टिलेज घट्ट राहावेत यासाठी पाणी आणि साखर यांचे मिळून एक आवरण बनते. 
लवकरच ‘सिंथेटिक जॉइंट लुब्रिकंट’ बाजारात उपलब्ध होईल. ऑस्टिओ आर्थरायटीसने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही दिलासाजनक बातमी आहे.

Ask a question regarding कृत्रिम वंगणामुळे मिळणार ऑस्टिओ आर्थरायटीसच्या रुग्णांना दिलासा 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here