2 MIN READ

भारतात ३ प्रकारचे पिण्याचे पाणी ( शुद्ध पेयजल) उपलब्ध आहे- नळाचे पाणी, बाटलीबंद पाणी आणि फिल्टर केलेले पाणी. प्रत्येक पाण्याची गुणवत्ता वेगळी आहे. भारतातील बऱ्याचशा भागांमध्ये नळाचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. पिण्याअगोदर ते उकळावे किंवा फिल्टर करावे लागते. भारतातील ग्रामीण भागांमध्ये नळाचे पाणी उकळून थंड करून पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरले जाते. शहरांमध्ये, नळाचे पाणी पाण्याचे फिल्टर्स वापरून मग पिण्यासाठी वापरले जाते.

कार्बनच्या माध्यमातून पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्याची जी जुनी पद्धत आहे त्यामुळे ९५%पर्यंत शुद्ध पेयजल मिळवले जाऊ शकते. RO म्हणजेच रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि UV प्युरिफायर्सच्या माध्यमातून सुद्धा शुद्ध पेयजल मिळवता येते. RO तंत्रज्ञान वापरून शुद्ध केल्या जाणाऱ्या पाण्यात अशुद्ध घटक नाहीसे झालेले असतात परंतु या प्रक्रियेदरम्यान नैसर्गिक क्षारही काढून टाकले गेल्याने हे पाणी शरीरास उपायकारक ठरत नाही. त्यामुळे जे लोक RO फिल्टर वापरतात त्यांच्या शरीराला आवश्यक नैसर्गिक क्षार मिळत नाहीत. UV प्युरिफायर्सच्या माध्यमातून पाण्यातील विषाणू आणि जिवाणू यूव्ही किरणांचा वापर करून नष्ट केले जातात.

बाटलीबंद पाणी म्हणजेच क्षार युक्त पाणी. या पाण्यात कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, आयरन (लोह) आणि मॅग्नेशियमचे क्षार मोठ्या प्रमाणात असतात. प्रवासात जेव्हा शुद्ध पेयजल उपलब्ध नसते तेव्हा बाटलीबंद पाणी पिण्यास प्रवासी प्राधान्य देतात. परंतु ज्या ज्येष्ठ नागरीकांना हाय ब्लड प्रेशर किंवा किडनीच्या विकारांची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाटलीबंद पाणी पिणे योग्य.

RO चे पाणी आरोग्यास उपायकारक आहे का?

रिव्हर्स ऑस्मॉसिस (RO) या पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान पाण्यातील रासायनिक घटक आणि क्षार काढून टाकले जातात. काही प्युरिफायर्समध्ये अशा प्रकारे काढलेले क्षार परत पाण्यात मिसळण्याची सुविधा उपलब्ध असते.

पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे क्षार शरीरासाठी अत्यावश्यक असतात. तज्ज्ञांच्या मतानुसार पाण्यातील एकूण विरघळलेले घनपदार्थ (total dissolved solids किंवा TDS) ५०-८० पीपीएम या प्रमाणात असणे आवश्यक आहे. परंतु RO पद्धत वापरून शुद्ध केलेल्या पेयजलात हे आवश्यक क्षार असल्यामुळे शरीरात त्यांचा अभाव निर्माण होतो. ज्या वृद्धांना अर्थ्रायटिस किंवा हाडे आणि सांध्यांचे विकार आहेत त्यांच्यासाठी RO प्युरिफायर्स वापरून शुद्ध केलेले पाणी अनारोग्यकारक ठरते. कॅल्शियमच्या अभावामुळे दातांचे आरोग्य देखील बिघडू शकते. काही ज्येष्ठ नागरीकांना मॅग्नेशियमच्या अभावामुळे चेतासंस्थेचे विकार, स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा थकवा येणे यांसारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे RO प्युरिफायर्स वापरणाऱ्या बऱ्याचशा कुटुंबाना डॉक्टर हे पोषक क्षार गोळ्या किंवा औषधांच्या माध्यमातून घेण्याचा सल्ला देतात.

याव्यतिरिक्त, RO या पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान पाण्यातील विषाणू आणि जिवाणू यांचा नायनाट न झाल्याने काही डॉक्टर पाणी उकळून मग त्यावर  ROची प्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.

शुद्ध पेयजल: RO विरुद्ध UV प्युरिफायर

RO आणि UV प्युरिफायर मध्ये बराच फरक आहे.

RO प्रक्रियाUV प्रक्रिया 
रिव्हर्स ऑस्मॉसिस या प्रक्रियेच्या माध्यमातून पाण्याचे शुद्धीकरणअतिनील किरणे वापरून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया
पाण्यातील डोळ्यांना दिसणारे आणि न दिसणारे सर्व दूषित घटक या पाण्यातून नष्ट केले जातात. परंतु  विषाणू आणि जिवाणू यांचा नायनाट होत नाही.अतिनील किरणे पाण्यातील  विषाणू आणि जिवाणू यांचा समूळ नायनाट करतात. त्यामुळे हे पाणी अत्यंत शुद्ध असते.
ROची प्रक्रिया करून देखील हे पाणी उकळल्याशिवाय पिऊ शकत नाही.पाणी उकळावे लागत नाही.
एकदा प्युरिफायर बसवला की पुन्हा फार खर्च येत नाही.यूव्ही प्युरिफायर तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याने वारंवार खर्च करावा लागू शकतो.

 

ROची प्रक्रिया केलेले क्षारविरहीत पेयजल नागरीकांसाठी जास्त धोकादायक आहे असा मुद्दा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मांडला आहे. त्यामुळे जर यूव्ही प्युरिफायरचा खर्च सहज परवडत असेल तर हाच शुद्धीकरणाचा मार्ग उत्तम आहे. यूव्ही प्युरिफायर ऐवजी पारंपरिक कार्बन फिल्ट्रेशनची पद्धतदेखील तुम्ही वापरू शकता.

Also read this here in English

Ask a question regarding ROमार्फत मिळते का शुद्ध पेयजल?

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here