2 MIN READ

विकृती म्हणजे नेमके काय?

भारतात सहा टक्के पेक्षा जास्त वरिष्ठ नागरिक विकृतीचा सामना करतात. विकृती आहे एक मानसिक विकार आहे. यात रुग्णाला कोणावर तरी अत्याचार करावेसे वाटतात, भीती दाखवावीशी वाटते किंवा एखादी भयानक चाल खेळावी असे वाटते. कधी कधी तर आपल्या जोडीदाराच्या चारित्र्याविषयी संशय सुद्धा निर्माण होतो आणि त्यामुळे घरात कुणीतरी आहे असा भास होतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मनोविकृती फार गंभीर रूप धारण करू शकते. हा विकार इतक्या भ्रामक कल्पना निर्माण करतो, की रुग्णाकडे त्याला जे भास होत आहेत ते सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा तथ्य उपलब्ध नसते. अशा भ्रामक कल्पनांमुळे स्मृतीभ्रंश सुद्धा होऊ शकतो.

एकाकीपण आणि विकृती

विकृतीचे कोणतेही ठराविक कारण नाही. प्रत्येक रुग्णाचे  विकृतीमागील वेगळे कारण असू शकते. परंतु बऱ्याच संशोधनानंतर आता हा शोध लागला आहे कीः विकृती बहुधा काही निवडक कारणांमुळे होऊ शकते. चला पाहूया विकृती होण्यामागील कारणे.
१. सतत आपल्याला काय वाटते हे सांगताना गोंधळात पडणे
२. कायम स्वतःला कमी लेखणे
३. इतरांच्या विचारांविषयी आणि मतदान विषयी उदासीनता
४. स्वतःच्या मतांविषयी ठाम असणे आणि योग्य असले तरी दुसऱ्याचे मत न घेणे
५. एकाकीपण
६. पूर्वायुष्यातील मानसिक आघात

हे आवर्जून वाचा: पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या वृद्धांची काळजी कशी घ्यावी

विकृतीमुळे येणारा एकाकीपणा

ज्या ज्येष्ठ नागरिकांनी एकाकीपण अनुभवले आहे त्यांना मानसिक विकृती लवकर जडू शकते. दुसऱ्या बाजूने विचार करता अशी मानसिक विकृती जडलेली वृद्ध माणसे घरात कुणालाही हवीहवीशी वाटत नाहीत. स्वतःच्या भ्रामक कल्पनांच्या जगात जगत असल्यामुळेत्यांच्या सांगण्यावरकोणीच विश्वास ठेवत नाही. त्यामुळे असे ज्येष्ठ नागरिक आपोआप एकाकी पडतात.
मानसिक विकृती जडलेल्या व्यक्ती अविश्वासा खातर इतर लोकांशी होत असलेल्या भेटी-गाठी टाळतात आणि घरात एकटे राहणे पसंत करतात. असे केल्याने त्यांच्यातील अगोदरच ठासून भरलेल्या एकटेपणात भर पडते.

विकृतीवर उपचार

भारतात विकृतीविषयी बऱ्याच शंका-कुशंका आहेत. मानसिक विकृती जडली आहे हे चटकन कोणी स्वीकारत नाही. हा आजार बळावल्यावरच त्यावर उपचार करणे आवश्यक आहे हे रुग्णाच्या कुटुंबीयांच्या लक्षात येते. ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी उपचारांसाठी घरा बाहेर जाण्यास नकार देतात.

कॉग्निटिव्ह थेरपीच्या आधारे रुग्णाशी संवाद साधून मनोविकाराचे डॉक्टर एकाकीपणातून उद्भवलेल्याविकृती वर उपचार करतात. ही उपचार पद्धती यशस्वी मानली जाते. अशा मानसिक विकृतीविषयी इतरांशी सुद्धा चर्चा केल्यास अशा एकाकीपणातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकया आजारातून बरे होऊ शकतात.

सपोर्ट ग्रुपच्या आधारे मानसिक विकृती जडलेल्या किंवा एकट्या पडलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून एकाकीपण दूर करता येऊ शकते.

मानसिक विकृतीसोबत जगणे ज्येष्ठांसाठी अवघड असते. योग्य वेळी औषधोपचारांना सुरुवात तसेच संवाद साधल्याने एकाकीपणातून उद्भवलेली मानसिक विकृती बरी करणे सोपे आहे.

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांमध्ये सोमॅटायझेशन डिसॉर्डर: कामी येतेय माइंडफुलनेस थेरपी

Ask a question regarding ज्येष्ठांमध्ये एकाकीपणातून जन्म घेतेय मानसिक विकृती

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here