2 MIN READ

भारतात, किडनीच्या विकाराच्या शेवटच्या अवस्थेत असलेल्या रुग्णांपैकी २१ टक्के रुग्णांना दरवर्षी डायलिसिसची आवश्यकता असते. सामान्यतः, जेव्हा दोन्ही किडन्यांचे कार्य थांबते तेव्हा डायलिसिस करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, जेव्हा डायलिसिसमुळेही रुग्णाला आराम मिळत नाही तेव्हा किडनीच्या विकाराच्या शेवटच्या टप्प्यात किडनी प्रत्यारोपण आवश्यक असते. वारंवार डायलिसिस करत राहिल्यावरही जेव्हा शरीरात खालील बदल जाणवतात तेव्हा किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे असे समजावे:

डायलिसिसनंतर देखील शरीरातील हे बदल घडतात तेव्हा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते.

 1. शरीरात लाल रक्तपेशी नसल्यामुळेदुर्बलता जाणवते
 2. श्वासोच्छवासाची समस्या
 3. ऑक्सिजन नसल्यामुळे अस्वस्थ वाटणे किंवा चक्कर येणे
 4. पायाच्या घोट्यांवरसूज येणे तसेचडोळे, पोट, चेहरा इ. अवयवांवर सूज येणे
 5. श्वासांमध्ये दुर्गंध
 6. भूक न लागणे आणि तोंडाची चव जाणे
 7. संपूर्ण शरीराला खाज
 8. मूत्रमार्गात झालेल्या संसर्गामुळे वारंवार लघवीला होणे किंवा मूत्रमार्गात अडथळा
 9. किडनी प्रत्यारोपणाला रीनल ट्रान्सप्लांट देखील म्हणतात, ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरात निरोगी किडनीचे प्रत्यारोपण होते. किडनी देणारे सामान्यत: कुटुंबातील सदस्य असतात, त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या शरीरातून किडनीची पूर्तता होऊ शकते. जिवंत किडनी दात्याच्या शरीरातील किडनीचे रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यासाठी ३.२५ लाखांपर्यंत खर्च येतो तर मृत व्यक्तीच्या किडनीच्या प्रत्यारोपणासाठी हा खर्च २ लाखांपर्यंत येतो. हा फक्त प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च. पण याशिवाय वैद्यकीय खर्च, औषधे आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याचा खर्च हे सुद्धा गृहीत धरणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी हा खर्च करणे कठीण आहे त्यामुळे त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.

हे आवर्जून वाचा: किडनीच्या विकारांविषयी काल्पनिक गोष्टी आणि तथ्ये

भारतातील पाच हॉस्पिटल्समध्ये किडनी प्रत्यारोपण स्वस्तात होऊ शकते

भारतात काही हॉस्पिटल्स आहेत, जेथे खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी खर्चात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. चला पाहूया ही ५ हॉस्पिटल्स कोणती आहेत?

 1. सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली:या हॉस्पिटलमध्ये फारच कमी खर्चात किडनी प्रत्यारोपण केले जाते. ऑक्टोबर २०१३ मध्ये, रुग्णाच्या शरीरात किडनी प्रत्यारोपण मोफत करण्यात आले होते. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोफत औषधे देखील येथे उपलब्ध आहेत. आपण या रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी विभागाशी संपर्क साधू शकता (011 2673 0000).
 2. तमिळनाडू किडनी रिसर्च फाउंडेशन (TANKERफाऊंडेशन): या फाउंडेशनमध्ये अनुदानित दरामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे आणि ज्या नागरिकांचे उत्पन्न कमी आहे त्यांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देखील केले जाते. 044 – 28341635, 044 – 43090998 या नंबरवर संपर्क साधून आपण अधिक माहिती मिळवू शकता.
 3. एआयआयएमएस, नवी दिल्ली:ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स द्वारे किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा फारच कमी किंमतीत पुरविली जाते. इथे या सर्जरीसाठी ६५ हजार रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. 011-26588500 / 26588700 या नंबरवर संपर्क साधून आपण ट्रान्सप्लांटच्या या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
 4. गुजरात किडनी फाऊंडेशन:या संस्थेत सरकारी हॉस्पिटल्सपेक्षाही कमी खर्चात किडनीच्या रोगांचा उपचार केला जातो. गरजू आणि गरीबांना देखील किडनी दान आणि प्रत्यारोपणावर विशेष सवलत मिळते. 079 26652220 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही गुजरात किडनी फाऊंडेशनद्वारे पुरविलेल्या सुविधांबद्दल माहिती मिळवू शकता.
 5. इंदिरागांधी गव्हर्नमेंटजनरल हॉस्पिटलपाँडिचेरी : या हॉस्पिटलमध्ये विनामूल्य किडनी प्रत्यारोपण केले जाते. परंतु, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांचे किडनी दात्यासोबत थेट नटे असणे आवश्यक आहे. 0413 2336971 या क्रमांकावर संपर्क साधून आपण या सेवेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

या हॉस्पिटल्समध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेतल्याने आपण कमी खर्चात निरोगी आयुष्याचा आनंद घेऊ शकता.

हे आवर्जून वाचा: किडनीस्टोन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?

Ask a question regarding  किडनी प्रत्यारोपण आता होणार स्वस्तात 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here