2 MIN READ

माइंडफुलनेस वर आधारित उपचारपद्धती बऱ्याचदा शारीरिक आणि मानसिक विकारांशी सामना करण्यासाठी वापरली जाते. विशेषतः नैराश्य, अतीव वेदना आणि ताण-तणाव यावर माइंडफुलनेस उपचारपद्धती हा रामबाण इलाज आहे. बौद्ध धर्मातील तत्वांच्या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी ही उपचारपद्धती अस्तित्वात आली. ज्येष्ठांसाठी लाभदायक असणारी सकारात्मकता आणि शांती या माइंडफुलनेस उपचारपद्धतीतून मिळते.

१९७०च्या दरम्यान फक्त शारीरिक वेदना दूर करण्यासाठी वापरली जाणारी माइंडफुलनेस थेरपी हा आता मानसिक व्याधींवरही खात्रीशीर इलाज आहे.

हे आवर्जून वाचा: पहा: वृद्ध प्रौढांमध्ये मानसिक आरोग्य आणि कल्याण: डॉ धनंजय चव्हाण यांच्याशी…

माइंडफुलनेस आणि सोमॅटायझेशन डिसऑर्डर

माइंडफुलनेस थेरपीचा  सोमॅटायझेशन डिसॉर्डरसाठी काय फायदा होतो हे पाहण्याआधी सोमॅटायझेशन डिसॉर्डरचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा ज्येष्ठ रुग्णांना असे वाटते की त्यांना शरीराच्या एखाद्या भागात प्रचंड वेदना होत आहेत. परंतु सर्व तपासण्या करून देखील रिपोर्ट्स अगदी नॉर्मल येतात. अशा वेळी त्यांना गरज असते ती, हा विकार अस्तित्वात नाहीये हे सांगणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाची.  सोमॅटायझेशन डिसॉर्डरमध्ये रुग्णाला वेदनेमुळे जाणवणारा थकवा, चिडचिड, सतत मूडमध्ये बदल इत्यादी लक्षणे दिसून येतात. खासकरून क्रोनिक फटीग सिंड्रोम, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, फायब्रोमायल्जिया या विकारांमध्ये माइंडफुलनेस थेरपीची आवश्यकता असते.

कॉग्निटिव्ह थेरपीद्वारे रुग्णाशी चर्चा करून  सोमॅटायझेशन  डिसॉर्डरविषयी योग्य माहिती दिले जाते. काल्पनिक वेदनांविषयी रुग्णाला पटवून देण्याच्या या पद्धतीद्वारे फक्त ३० टक्के रुग्ण बरे होतात. परंतु एका सर्वेक्षणानुसार माइंडफुलनेस थेरपीचा वापर केल्याने सोमॅटायझेशन डिसॉर्डरचे सर्व म्हणजेच १०० टक्के रुग्ण बरे होतात.

 हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत करणारी ५ ॲप्स

माइंडफुलनेस थेरपी कामी येते ह्या गंभीर आजारांतही

1. फायब्रोमायल्जिया

फायब्रोमायल्जिया सिंड्रोममध्ये संपूर्ण शरीरात असह्य शारीरिक वेदना होतात परंतु त्याचे कारण कळू शकत नाही. निद्रानाश, नैराश्य, चिंता आणि सतत मूड बदलणे ही  फायब्रोमायल्जियाची इतर लक्षणे आहेत. फायब्रोमायल्जियासाठी कॉग्निटिव्ह थेरपी आणि  माइंडफुलनेस थेरपी घेत असलेल्या ५०% पेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये उपचारानंतर लक्षणीय सुधारणा आढळून आली आहे.

2. क्रोनिक फटीग सिंड्रोम (प्रचंड थकवा)

क्रोनिक फटीग सिंड्रोमने त्रस्त असलेल्या व्यक्तीला ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रचंड शारीरिक व मानिसक थकवा जाणवतो. माइंडफुलनेस थेरपीचा या क्रोनिक फटीग सिंड्रोमसाठी लक्षणीय फायदा होतो.

3. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (आतड्यांचा विकार)

५-११ टक्के लोकांमध्ये आणि खासकरून त्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आढळतो. या आजारात प्रचंड पोटदुखी होते. कॉग्निटिव्ह थेरपी, सायकोडायनॅमिक थेरपी आणि हिप्नॉटीझम (संमोहन) सारख्या मनौपचारांद्वारे या आजाराच्या उपचारास मदत होते. या सर्वांच्या जोडीला माइंडफुलनेस थेरपी ने उपचार केल्यास रुग्णात लक्षणीय सुधारणा दिसू शकते.

एका सर्वेक्षणांतर्गत सोमॅटायझेशन डिसॉर्डरचे कारण न कळल्यास माइंडफुलनेस आणि कॉग्निटिव्ह थेरपी या दोन्हींचा वापर रुग्णांसाठी केला गेला. सर्वेक्षणाअंती या रुग्णांच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून आली. माइंडफुलनेस थेरपीच्या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळे आणि यासाठी लागणाऱ्या अगदी अत्यल्प खर्चामुळे सोमॅटायझेशन डिसॉर्डर्सच्या औषधोपचारासोबत ही उपचारपद्धतीसुद्धा वापरण्यात येऊ लागली आहे.

Ask a question regarding ज्येष्ठांमध्ये सोमॅटायझेशन डिसॉर्डर: कामी येतेय माइंडफुलनेस थेरपी

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here