किडनीच्या विकारांविषयी काल्पनिक गोष्टी आणि तथ्ये

चुकीच्या ज्ञानामुळे आपण किडनीविषयी बऱ्याच शंकाकुशंका बाळगून असतो. किडनीच्या विकारांविषयी वृद्धांमध्ये अजूनही अनेक काल्पनिक गोष्टींमुळे धास्ती असल्याचे दिसून येते. चला पाहूया अशा काल्पनिक गोष्टी कोणत्या आहेत आणि तथ्य काय आहे

0
3 MIN READ

काल्पनिक गोष्ट क्र. १: किडनीचा कोणताही रोग बरा होऊ शकत नाही 

तथ्य: काही किडनीचे विकार बरे होऊ शकतात. जर रोगाच्या प्राथमिक अवस्थेत निदान आणि योग्य उपचार झाले तर बरेचसे किडनीचे विकार बरे होऊ शकतात. योग्य निदान आणि उपचारांमुळे किडनीचे आरोग्य बरेच दिवस उत्तम राहू शकते. 

काल्पनिक गोष्ट क्र. २: एक किडनी निकामी झाली तरी शरीराला धोका आहे

तथ्य: एका किडनीचे कार्य बंद झाले तरी रक्तातील युरिया नायट्रोजन, क्रिएटिनाइन अगदी व्यवस्थित असल्याचे तपासणीत निदर्शनास येते. त्यामुळे एक किडनी निकामी झाली तरी दुसरी किडनी शरीराचे कार्य चालविण्यास पुरेशी आहे असे आपण म्हणू शकतो. जर दोन्ही किडन्या निकामी झाल्या तर मात्र रक्तातील अतिरिक्त टाकाऊ पदार्थ म्हणजेच युरिया नायट्रोजन, क्रिएटिनाइनचे प्रमाण वाढल्याचे रिपोर्ट्स मध्ये आढळते. 

काल्पनिक गोष्ट क्र. ३: एडिमा म्हणजेच पायाला आणि पायाच्या घोट्याला सूज असेल तर किडनी निकामी झाली असे समजावे 

तथ्य: काहीवेळा किडनीचे कार्य व्यवस्थित चालू असूनसुद्धा पायाला आणि पायाच्या घोट्याला सूज येते. याउलट, काही किडनीचे रुग्ण शेवटच्या टप्प्यात असतानादेखील त्यांच्या पायाला आणि पायाच्या घोट्याला सूज येत नाही. त्यामुळे जर सूज आढळली तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य. 

काल्पनिक गोष्ट क्र. ४: किडनीच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यायलाच हवे. 

तथ्य: काही विकारांमध्ये किडनीचे कार्य आणि आरोग्य नियंत्रित करण्यासाठी कमी पाणी प्यावे लागते. याउलट, मूत्रवाहिनीचा किंवा किडनी स्टोनचा आजार असेल तर मात्र भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.  

काल्पनिक गोष्ट क्र. ५: मी अगदी ठणठणीत आहे किंवा माझी किडनी आता पूर्ववत काम करू लागली आहे. 

तथ्य: अगदी गंभीर स्वरूपाच्या किडनीच्या विकारात सुद्धा कधी कधी या विकाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये दिसून येत नाहीत. तपासणीच्या रिपोर्ट्समध्ये आढळलेल्या माहितीच्या आधारे या आजाराचा शोध घेता येऊ शकतो. काहीवेळा गंभीर स्वरूपाच्या किडनीच्या विकाराचे उपचार घेताना रुग्णाला असे वाटू शकते की आता तब्येतीत सुधारणा आहे म्हणून उपचार थांबवण्यास हरकत नाही. परंतु, अशा प्रकारे मध्येच उपचार थांबवणे धोक्याचे ठरू शकते. हा विकार उग्ररूप धारण करून जोमाने बळावतो आणि यामुळे किडनी ट्रान्सप्लान्टेशन किंवा डायलिसीसची गरज पडू शकते.

काल्पनिक गोष्ट क्र. ६: आयुष्यभर डायलिसिसवर अवलंबून राहावे लागेल.     

तथ्य: किडनी काही कारणास्तव काही काळासाठी निकामी किंवा जखमी झाल्यास ती पूर्ववत होईपर्यंत काही कालावधीसाठी डायलिसिसची आवश्यकता असते. यानंतर किडनी आपले कार्य पुन्हा सुरु करते. पण यादरम्यान डायलिसिसला उशीर केल्यास ते धोकादायक ठरू शकते. मात्र गंभीर स्वरूपाच्या किडनीच्या विकारात आयुष्यभर डायलिसिसवर विसंबून राहावे लागते किंवा किडनी ट्रान्सप्लान्टेशन करावे लागते. 

Ask a question regarding किडनीच्या विकारांविषयी काल्पनिक गोष्टी आणि तथ्ये

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here