2 MIN READ

केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातच अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशन) ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आशिया खंडात प्रत्यारोपणासाठी पुरेसे अवयव दान केले जात नाही. फक्त भारताचा विचार करता मृतांचा आकडा इतका आहे की अवयवांचा अभाव होणे शक्य नाही परंतु तरीही प्रत्यारोपणासाठी पुरेसे अवयव मिळवणे कठीण जाते.   

भारतात प्रत्यारोपणासाठी अवयवांचा अभाव

जर आपण आकड्यांच्या माध्यमातून या माहितीचे अवलोकन केले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात दरवर्षी १.८ लाख नागरीकांना किडनी निकामी झाल्याचे निदान केले जाते. परंतु किडनी प्रत्यारोपणाच्या केवळ ६००० शस्त्रक्रिया होतात. किडनीचे गंभीर विकार झालेले ६४ टक्के वृद्ध नागरीक असे आहेत, ज्याचे सरासरी वय ६६.४ वर्षे आहे. जर यकृताचा (लिव्हर) विचार केला तर भारतात दरवर्षी २ लाख लोकांचा मृत्यू यकृताचा कॅन्सर झाल्याने होतो. यातील १०-१५ टक्के लोकांना यकृताचे प्रत्यारोपण करून वाचविणे शक्य आहे. भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार लोकांचे हृदय निकामी होते आणि दुर्दैवाने यातील केवळ १० ते १५ लोकांवरच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. डोळ्यांचा कॉर्निया म्हणजेच नेत्रपटल बदलण्याची गरज दरवर्षी १ लाख लोकांनाअसते परंतु प्रत्यारोपणासाठी कमी पडणाऱ्या अवयवांमुळे यातील फक्त २५ हजार शस्त्रक्रिया करणेच शक्य होते.

या आकड्यांचे अवलोकन करून आपण भारतातील अवयव दानाची गरज ओळखू शकतो. भारतात आता प्रत्यारोपणाची परिस्थिती हळूहळू बदलत आहे. भारत सरकार आणि काही एनजीओज मिळून सकारात्मक बदलाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहेत. याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे नागरीक स्वतः अवयव दानासाठी पुढे सरसावत आहेत. या बदलामुळे अवयवांची मागणी आणि पुरवठा यांमधील अंतर मिटेल याबाबत खात्री आहे. चला पाहूया हा बदल घडविण्यासाठी सरकारने कोणत्या योजना राबविल्या आहेत:

अवयव प्रत्यारोपणामुळे वृद्ध रुग्णांना मिळेल जीवनदान

भारत सरकारने नॅशनल ऑर्गन ट्रांसप्लांट प्रोग्राम भारतातील सर्व राज्यांमध्ये सुरु केला आहे. मृतांच्या अवयवांचे दान केले जावे आणि गरजू नागरीकांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध व्हावेत हे याचे उद्दीष्ट आहे.  या उपक्रमाअंतर्गत चंदीगढ, मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि गुवाहाटी इत्यादी शहरांमध्ये उच्चस्तरीय NOTTO (नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रांसप्लांट ऑर्गनायझेशन) केंद्रांची स्थापना केली आहे. स्वास्थ्य आणि परिवार कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी या उपक्रमासंदर्भात नुकतीच राज्यसभेत घोषणा केली.

अवयव प्रत्यारोपणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी एक टोल फ्री नंबर नागरीकांच्या सेवेत रुजू झाला आहे: 1800114770 (NOTTO द्वारे सुरु केली गेलेली ही हेल्पलाईनची सुविधा दररोज २४ तासांसाठी उपलब्ध आहे.)

भारत सरकार ने SOTTO(स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रांसप्लांट ऑर्गनायझेशन)साठी सुद्धा निधीची व्यवस्था केली आहे. ही सुविधा मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, हरियाणा, गोवा, जम्मू आणि काश्मीर, ओडिसा तसेच उत्तर प्रदेश आदी राज्यांत उपलब्ध आहे. SOTTO द्वारे अवयवांची उपलब्धता आणि उतींचे संकलन यासंदर्भात राज्यस्तरावर नोंद ठेवली जाते. मृतांच्या अवयवांचा प्रत्यारोपणासाठी उपयोग व्हावा यासाठी SOTTO प्रयत्नरत आहे.

भारत सरकारद्वारे अवयव प्रत्यारोपण आणि ऊतींचे संकलन यासाठी आणखीही अनेक प्रयत्न चालू आहेत.

Ask a question regarding नॅशनल ऑर्गन ट्रांसप्लांट प्रोग्राम वृद्धांना देणार नवजीवन 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here