ज्येष्ठांसाठी सर्जरीनंतरचे सोपे व्यायामप्रकार

वृद्धावस्थेत सर्जरी झाल्यानंतर हळूहळू पूर्वीसारखे चालते फिरते होण्याची आवश्यकता असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्जरीनंतर डॉक्टर्स आराम करण्याचा सल्ला देतात. अशा वेळी शरीराने झीज भरून काढण्यासाठी न वापरलेल्या कॅलरीज शरीरात साठत राहतात आणि यामुळे वजन वाढते. परंतु, वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्जरी झालेल्या अवयवांना त्रास होईल असे व्यायामप्रकार करून चालत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठांनी सर्जरीनंतर कोणते व्यायाम करावेत हे ठरविणे अवघड जाते. चला पाहूया सर्जरीनंतर करण्यासाठी सोपे व्यायामप्रकार (हे व्यायाम डॉक्टरांच्या सल्याने करावेत.):

0
2 MIN READ

चालणे:

सुरुवातीला सपाट पृष्ठभागावरुन चालण्याचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिवसभरात ५०० मीटर अंतर चाला व हळूहळू हे अंतर वाढवत न्या.चालण्यामुळे तुमचे पाय मोकळे होतील व संपूर्ण शरीर मजबूत होईल. तुम्हाला चालण्याची सवय झाल्यानंतर नियमित काही मिनीटे मध्यम वेगाने व काही मिनीटे ब्रिस्क वॉक(फार वेगाने) घ्या त्यानंतर पुन्हा थोडा वेळ आराम करा.असे कमीतकमी ३-४ वेळा करा.यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतील व तुमच्यामधील उर्जा देखील वाढेल.

पोटाचा आणि मणक्याचा व्यायाम:

हा व्यायाम करण्यासाठी पाय सरळ करुन बसा व हळूहळू पाठीचा कणा वाकवत पुढच्या दिशेन वाका. हात पायांच्या अंगठ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. मणक्यावर जास्त ताण घेऊन हा व्यायाम करु नका. तसेच वाकताना शरीराला हिसका बसणार नाही याची देखील काळजी घ्या. याला पश्चिमोत्तानासन असेही म्हणतात.

थोडे थोडे वजन उचलणे:

वजन उचलताना शरीराचा तोल सांभाळण्याची क्रिया चांगली होते आणि पोट व इतर भागावरील चरबी कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला दोन्ही हातात बादलीत झेपेल इतके पाणी घ्यावे आणि बादल्या उचलावा. मग हळूहळू पाण्याची पातळी वाढवत जावी.

क्रंचेस:

सर्जरीनंतर काही दिवसांनी क्रंचेस सुरु करण्यास देखील काहीच हरकत नाही. यात उताणे झोपून दोन्ही हात डोक्याखाली घ्यावे. दोन्ही पायांचे गुढघे वाकवावे आणि पावले जमिनीवर ठेवावीत. हळूहळू डोके वर उचलावे आणि पोटापर्यंत शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

स्ट्रेचिंग:

स्ट्रेचिंग म्हणजे हात व पाय मोकळे करत कंबर, पाठ, पोटावर ताण देणे. हृदय विकारामुळे मेंदूतील काही महत्वाचे भाग, ग्रंथींपर्यंत रक्तपेशी पोहोचत नाहीत. स्ट्रेचिंगमुळे स्नायू मोकळे होतात तसेच अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या पूर्ववत होण्यास मदत होते. व्यायाम करताना शरीरावर आलेला ताण स्ट्रेचिंगमुळे नाहीसा होतो.

Ask a question regarding ज्येष्ठांसाठी सर्जरीनंतरचे सोपे व्यायामप्रकार

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here