1 MIN READ

पाश्चिमात्य देशांशी तुलना करता भारतात लग्नसंस्था भावनिक आधारावर उभी असते. पवित्र अशा या बंधनात जन्मजन्मांतरीच्या सोबतीची शपथ घेतली जाते. त्यासाठी व्रत वैकल्ये केली जातात. हे नाते जोडीदाराच्या मृत्यूनंतरसुद्धा संपुष्टात येत नाही. पण अचानक सोडून गेलेल्या जोडीदाराच्या पश्चात मागे राहिलेल्यांची काय अवस्था होते?

अचानक सोडून गेलेल्या जोडीदाराच्या पश्चात ज्येष्ठ नागरिकांची फार करुणाजनक अवस्था होते. त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली असते. सेवानिवृत्तीनंतर पुढे काय करायचे हे ठरवलेले नसते. त्यांची मुले नोकरीनिमित्त परदेशी किंवा दूरगावी स्थायिक झालेली असतात. आपल्या जोडीदारासोबत उर्वरित आयुष्य सुखाने व्यतीत करण्याचे स्वप्न जोडीदाराच्या जाण्याने विखुरते.

ज्येष्ठ नागरीकांमध्ये पुनर्विवाहाची संकल्पना फारशी न रुजल्याने मागे उरलेले, एकटे पडलेले लोक आजारपणाने, मानसिक विकाराने त्रस्त होतात. जोडीदाराविना, मुलाबाळांविना हे वृद्ध नागरीक नैराश्याच्या खोल गर्तेत जातात.

आता मात्र, अशा एकट्या पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पुनर्विवाहाच्या संकल्पनेची पाळेमुळे खोलवर रुजत आहेत. बऱ्याचदा मुलेच त्यांना लग्नासाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळे अशी लग्ने आता निषिद्ध मानली जात नाहीत. वस्तुस्थिती पाहता, ज्येष्ठ नागरीक स्वतः सुद्न्य आहेत. स्वतःचा एकटेपणा ओळखून जोडीदाराची साथ असण्याचे महत्व त्यांना कळले आहे.

लग्नाच्या वयाची मर्यादा वाढत आहे. १९८० च्या दशकात सुरुवातीला वयाच्या १८ ते २० वर्षाच्या आसपास, १९९० च्या दशकात २०-२२ व्या वर्षी त्यानंतर ३०व्या वर्षी आणि आता चाळीशीच्या आसपास लग्ने होताना दिसतात. मुलींची लग्ने लवकर केली जात असत पण आता मुली स्वतःच्या पायावर जोपर्यंत उभ्या राहत नाहीत तो पर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतात.

आवर्जून वाचा: सत्तरी ओलांडलेल्या नटुभाईंनी बांधल्या ज्येष्ठांच्या रेशीमगाठी

जरी समाजात वयाच्या उत्तरार्धात लग्न करण्याची संकल्पना मान्य असली तरी जोडीदाराच्या पश्चात उतारवयात दुसरे लग्न किंवा पुनर्विवाह करण्याची पद्धत समाजात भारतातील काही भागांत  अमान्यच आहे. किंबहुना, दुसरे लग्न हे पहिल्या जोडीदाराच्या आठवणींशी प्रतारणा केल्याप्रमाणे मानले जाते.

वृद्ध नागरीक एकटे असताना त्यांची मानसिक स्थिती जास्त नाजुक असते हे तरुण पिढीला उमजत नाही. या वयात त्यांना पाठिंब्याची, जोडीदाराची जास्त गरज असते. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी दुसऱ्या हाताच्या आधाराची गरज असते. जरी मुले आणि इतर कुटुंबीय त्यांच्यावर नितांत प्रेम करत असले तरीही, खांद्यावर डोके टेकण्यासाठी, सुख-दुःख वाटण्यासाठी काळजी घेणारे हक्काचे कोणीतरी पाहिजे. पुनर्विवाह हा वृद्धांसाठी सुखाचा कानमंत्र आहे. हो ना?

Ask a question regarding आयुष्याच्या उत्तरार्धाची नवी सुरुवात: ज्येष्ठ नागरिकांचे विवाह

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here