डिमेंशियाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असे 10 ऍप्स

0
3 MIN READ

1. Dementia and Caregiving


तुमच्या नात्यातील कोणाला डिमेंशिया आहे का? त्यांना मदत व्हावी म्हणून तुम्ही मोबाईल ऍप्स चा शोधात आहात का? मग काळजी नसावी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

खाली आम्ही काही ऍप्सची माहिती दिली आहे जे डिमेंशिया असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि ते त्यांचे जीवन सोप्पे करतील तसेच यांमुळे त्यांचे दुसऱ्यावर अवलंबून राहणे कमी होईल.

2. IRIDIS (आय आर आय डी आय एस)

तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरातील भिंती आणि फर्निचरच्या रंगामुळे डिमेंशिया असलेल्या रुग्णांमध्ये सुधार येऊ शकतो? हे ऍप तुम्ही अपलोड केलेल्या फोटोज आणि प्रश्नावलीच्या आधारावर तुमच्या घराचे विश्लेषण करते. यातून मिळालेल्या सूचनांचे आणि सल्ल्यांचे पालन केल्यास तुमचे घर रुग्णांच्या दृष्टीने योग्य होईल.

 

3. Scrabble(स्क्रॅबल)

काही गेम्स तुमच्या मेंदूला उत्तेजित करून तुमची संज्ञात्मक क्षमता सुधारू शकतात. या प्रसिद्ध ऍप मधून तुम्ही तुमच्या मित्राच्या विरोधात खेळू शकता किंवा तुम्ही एकटे (संगणकाच्या विरोधात) खेळू शकता. यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढतो.

4. Fall Detection(फॉल डिटेक्शन)

5.

भोवळ येऊन पडणे हि वृद्धांमधील एक मोठी समस्या आहे. हे ऍप मोबाईल मधील सेन्सरच्या मदतीने माणसाचे खाली पडणे डिटेक्ट करते आणि निवडलेल्या कॉन्टॅक्टसना मेसेज पाठवू शकते. खोटी नोटिफिकेशन जाऊ नये यासाठी या ऍप मध्ये अलार्म रद्द करण्यासाठी 30 सेकंदाचा कॉउंटडाउन टायमर देण्यात आला आहे.

6. Pill Reminder & Medication Tracker(पिल रिमायंडर अँड मेडिकेशन ट्रॅकर)

डिमेंशिया असलेलं रुग्ण वेळेवर औषधं घ्यायला विसरू शकतात. हे ऍप तुम्हाला आठवण करून देते ज्यामुळे तुम्ही तुमच्या गोळ्या घ्यायला विसरत नाही. यात ब्लडप्रेशर, वजन, ब्लड ग्लुकोज यांच्या नोंदी पण ठेवता येतात.

7. Let’s Create Pottery Lite(लेट्स क्रिएट पॉटरी लाईट)

ताण घालवण्यासाठी आणि तुमच्यामधील कलात्मकता जपण्यासाठी हे ऍप खूप फायदेशीर आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात आणि रंगात मातीची भांडी बनवू शकता.

8. Dementia Digital Diary/Clock(डेमेंशिया डिजिटल डायरी/क्लॉक)

घरी एखादा जुना फोन किंवा टॅबलेट आहे का? त्यावर हे घड्याळ इन्स्टॉल करा ज्यामुळे रुग्णांना वेळेची माहिती मिळेल. तसेच जर तुम्ही यावर वेळापत्रक सेव केलेत तर तेही यावर दिसत राहील ज्यामुळे रुग्ण तुम्हाला वारंवार तेच तेच प्रश्न विचारणार नाहीत.

9. Soothing Sleep Sounds(सुदींग स्लिप साऊंड्स)

चांगली झोप मिळणे यापेक्षा सुख ते काय! डेमेंशिया असलेल्या लोकांचे मन विचिलित होत राहते आणि त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो. या ऍप मध्ये आरामदायी संगीत आहे ज्यामुळे त्यांना चांगली आणि शांत झोप मिळेल.

10. Family Locator(फॅमिली लोकेटर)

डेमेंशिया असलेले लोक हरवण्याची शक्यता असते. या ऍप मध्ये जिपीएस ट्रॅकर आहे जो तुम्हाला तुमचे नातलग जिथे आहेत त्या ठिकाणची माहिती मिळते. एखाद्या ठराविक ठिकाणावरून निघाल्याचे किंवा तिथे पोचल्याचे नोटिफिकेशन पण हे ऍप कुटुंबातील सदस्यांना देऊ शकते.

11. Talking Ginger(टॉकिंग जिंजर)


डिमेंशिया असलेले रुग्ण एकटेपणाने त्रस्त असतात. या ऍप मध्ये ते जिंजर या मांजरीशी मैत्री करू शकतात, जी आपण बोलली वाक्य तिच्या आवाजात पुन्हा बोलते. तुम्ही तिच्याशी खेळू शकता, तिला गुदगुल्या करू शकता तसेच ती स्वप्नात काय बघत आहे तेही या एपद्वारे बघू शकता.

12. Mindmate(माईन्डमेट)

या ऍपचा उद्देश गेम्स आणि मेंदूसाठी असलेल्या व्यायामांच्या साहाय्याने मेंदूचे चलन सुधारणे आहे. या ऍप मुळे डेमेंशिया असलेल्या रुग्णांना स्वावलंबी होण्यास मदत होते. तसेच रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी पण या ऍप मध्ये काही सूचना आणि टिप्स आहेत.

Ask a question regarding डिमेंशियाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असे 10 ऍप्स

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here